अभ्याससाहित्य / कथा

आठवणीतील दिवाळी निबंध – Diwali Nibandh in Marathi

Essay on Diwali in Marathi

प्रत्येक सणाचे वैयक्तिक मत,महत्व आणि त्याचे असे एक सौंदर्य असते. जसे की पाडव्याच्या गुडी;बत्तासेनी गोड केली. गणपतीची आगमन;मोदकाचा मानपान. घटाची स्थापना ;दुर्गेचे माहेरपण. असेच सगळे सण आपले कौतुक सांगतात. आणि या याच्या वेगवेगळ्या रुपरंगांचे ,नाविन्यपूर्ण ओळख,आणि त्याच्या येण्याने उजळून जाणारी सकाळ ,त्यातून भासणारा हर्ष ;मनाला कोठून तरी सुख ,आनंद,हसण्याची आणि जिव्हाळ्याची फुंकर मारतो.

असे भासते की ,पहाटेच्या साखर झोपेला आपण जसे मिठीतुन कधीच सोडत नाही,तिलाच बिलगून पण लाडिक तिच्या खुशीत घुसून झोपावे,अजून असे वाटावे अजून रात्र संपलेलीच नाही ,आणि तेवढ्यात कोणी तरी आपल्या खोलीचे दार वाजवावे आणि म्हणावे ,”उठा उठा सकाळ झाली ;मोती स्नानाची वेळ आली” आणि चक्क जागे होवे! आणि पाहतो ,तर काय खरच बाहेर फटाके वाजतयात.
अहो,गोडीचा आणि समाधानाचा सण म्हणजे दिवाळी,आपुलकीचा सण म्हणजे दिवाळी, आनंदाचे वारे घेऊन येणार दिवाळीचा सण आपल्याला प्रत्येक दिवसाचे महत्व सांगत येतो.

दिवाळी मराठी निबंध

आमच्या दारातलीच रांगोळी बोलते. क्षणभर या थोडे बसा, आणि आमचा फराळ खा. आम्ही भावंडे दिवाळी का करतात ?माहीत नसताना देखील तिची वाट पाहायचो. आम्हाला आनंद हा असायचा की ,चला अत्ता आम्हाला शाळेला सुट्टी भेटणार,हा आनंद आमच्या गगनात मावत नसे.फराळाची ओढ आणि शाळेला सुट्टी लागण्या अगोदरच ,शाळा सुरू झाल्यावर आम्ही डब्यात कोणता फराळ घेऊन जाणार ,याचा आनंद आहे “दिवाळी “. स्वप्नवत जागे होवे ;आम्ही खूप मज्जा करणार ,दिवाळीचा अभ्यास द्यायीला नको असे वाटत असून देखील ,भारावलेल्या मनाने सुट्टीचा आंनद व्यक्त करण्यासाठी आम्ही बोलणार सर दया कितीही अभ्यास ,आणि सर तेच उत्साह बगून खूप अभ्यास देणार आणि आमचा सुट्टीचे”भूत लगेच डोक्यातून उतरणार”पण लगेच उतरलेला चेहरा बगून लगेच सर बोलणार, तुम्हाला “दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा “,म्हणून निम्मा अभ्यास नको करू!आणि हे बोलल्यावर जो आनंद होतो,ती म्हणजे आमची दिवाळीचा शाळेतून भेटलेला बोनस. आणि त्याच आनंदात शाळा सुटल्यानंतर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत,अख्या गावभर गोणधळ घालत आपल्या गावच्या रस्त्याने हुंदडत.

सगळ्या झाडांना,फुलांना ,पक्ष्यांना,वेलींना,रस्त्यानं भेटणाऱ्या वाठसरूंना आपल्या आनंदात सामावून घेत,रानात आपल्या कामात मग्न असणाऱ्या वाडीलधाऱ्यांना आपण साजरा करत असलेला दिवाळीचा आनंदात वाटेकरी बनवण्यात जे समाधान भेटते ,ते असते दिवाळी!
आमच्या बालपणात आम्ही सकाळी आधी कोण उठणार, आणि अगोदर कोण अभ्यंग स्नान करणार याची शर्यत लागायची,ज्यात नेहमीच मी शेवट यायीची. कारण हे तसेच होते. मी आम्ही मोट्या भावंडात लहान होती. आणि दिवाळी म्हणाले की ,नुकतीच थंडीची चाहूल लागलेली असायची,मग काय सकाळी लवकर उठणे म्हणजे,आमच्यासाठी थंडी वाजेल,मग आजारी पडेल”मग सर्दी ,ताप आला तर सगळे बोलतील ,फराळ नको खाऊ आजारी पडशील”,आणि हा विचार फक्त मनात राहिचा; तेवढयात मातोश्री गोड बोलून ,म्हणायच्या अहो,मनू तुमच्या जेष्ठ बंधू,भगिनी अभ्यंग स्नान करून ,फटाके वाजवायला गेलेत!असे बोलल्यावर थंडी उडून जायची आणि आम्ही पळत च अभ्यंगासाठी जायचो. आणि हिच आमची फजिती बगून घरातील सगळे हसायचे .आणि हाच गोढवा सगळ्यांचा हसरा चेहरा बघत आम्ही ,दिवाळीची पहिली अंघोळ करायचो. पण त्या अगोदर आमच्या घरातील सर्वात मोठ्यांपासून ते छोट्या परेंत सगळ्यांना उठणे लावले जायचे,जे उठणे आम्ही घरीच बनवायचो,मुख्य म्हणजे ते बनवण्यासाठी आम्हाला शाळेला सुट्टी लागली रे लागली. आणि घरी आलो की ,आज्जी आणि मम्मी सगळ्यांना गुलाबाची फुले,चंदनाचे लाकूड,जायफळ कुटून देने,आणि दुधाची साई हा सगळा सामानाची गोळाबेरीज एकत्र करायला सांगत आणि मम्मी-आज्जीला देणे. मग त्या रात्री त्याचे मिश्रण एकत्र करून गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून ते तांब्याच्या भांड्यात ठेवलं जायचं.

आम्ही सकाळी जेव्हा उठायचो तेव्हा माझ्या घरातील सर्व आई(चुलत्या, आणि मम्मी)आज्जी रात्री बनवलेलं उठणे ,घरातील सर्व जेष्ठांना लावण्यासाठी द्यायची आणि ते उठणे लावल्यानंतरच अभ्यंग स्नानासाठी सज्ज होईचे. मग त्यात पहिल्यांदा मोठे  काका, वडील, चुलते मग आम्ही चिली फॅक्टर परंतु त्यात देखील माझी काही भावंडे मला आधी मला आधी फटागडा वाजवायचं म्हणत,वडील आणि चुलयांच्या पुढे अंघोळ करत. तर अशा प्रकारे अंघोळ होईचे,मग आम्हा सर्वांना घरातील महिला औक्षण करायच्या आणि फराळ खाईल द्याच्या. आणि मग नंतर आम्ही आमच्या घराला सजवायला सुरू करायचो ,म्हणजे पणत्या लावायचो आणि अशा उकळलेल्या घराला अजून आनंदी करण्यासाठी आम्ही सर्व शेजारी एकमेकांच्या घराचे दार वाजवून एकमेका जागे करायचो ,त्या दिवशी “अवघे गाव आमचे एका आईच्या लेकरांसारखे ,ऐका- मेकाला एकत्र गोळा करून फटाके वाजवायला मंदिरासमोर भेटायचे”.आणि खरी धमाल सुरू करायचो.कोणी लवंगी फटाका, लक्ष्मी बॉम्ब,सुतळी बॉम्ब,पाऊस,भुईचक्र,तर कोणी चिली मिली वाजवायचो,काही जण तर फटाक्याच्या अवजानेच घरात पाळायचे,तसे मी पण सुरू सुरुला त्याच प्रकारात मोडायची. अत्ता असे बोलताना किंवा लिहिताना हासाय होते.

नक्की होईचे काय तर फटाक्यांचा आवाज आला की माझे हृदयाचे ठोके वाढायचे आणि मी दचकायचे .हे बघून मला माझे जवळचे मित्र-मैत्रिणी हसायचे आणि म्हणून मला रडायला यायचे. परंतु मला एक आवड लागली होती ,या सगळ्यात ती म्हणजे,वाजणाऱ्या आणि उडणाऱ्या फटाक्याच्या ज्या ठिणग्या उडायच्या ना ;आणि दारात जी काढलेली रांगोळी आणि लावलेल्या पणत्या होत्या ना त्याने आमचे घर खूप म्हणजे खूप स्वर्ग -सुंदर दिसायचे.आणि यात माझा आंनद दडला होता. हे फटाके वाजवताना जो आनंद झाला नाही तो आनंद होईचा.

एकदा तर काय झाले,मी माज्या काकांकडे मला फटाके वाजवाय शिकवा म्हणून गेले त्यांनी मला डबीतले फटाके कसे वाजवायचे हाताने ते सांगितले,आणि ते वाजवताना त्यांचा हात थोडा भाजला हे मला समजलं ;पण मला काही समजलं नाही असे दाखवले. आणि भीती पोटी सगळे त्यांनाच वाजवाय सांगितले. आम्ही दुपारचे टिकल्या वाजवताना आपसूकच आमच्या लक्षात आले की यातून जाळ निघतोय,म्हणजे आपल्याला शेखाय जाळ करता येईल,ही कल्पना चांगली होती.ऐरणीच्या चंगळाला आग लावली ,ऐराणीतले बटाटे जेवढे नसतील शेखले,त्याहून ज्यादा आमची पाटण शेखली.

एकुणात फटाके वाजवून झाल्या नंतर सर्व आम्ही दिवाळीचा फराळ एकत्र करून खायचो. पण हा फराळ आम्ही सर्व जण गटाने फिरून गोळा करायचो.आणि मग खायचो,आणि त्यात जी मज्जा होती ना ती आज मिळणे क्वचितच आहे.दिवाळीचा फराळ म्हणजे, चकली, लाडू,कानवले, शंकरपाळी, चिवडा,कापण्या इत्यादी होय.

दिवाळीच्या पहिल्या अंघोळीच्या अगोदर येणाऱ्या वसुबारस चे तिचे तिचे असे एक महत्त्व होते. ते म्हणजे त्या दिवशी जेवणात मकेचे दाणे भरडून जे पीठ तयार होते,त्याला शिजवून ताकात खायचे सगळ्यांनी,आणि सोबत गवारीची शेंग त्याचाच नैवेद्य गाई-म्हैशी ना दाखवला जायचा. आणि संध्याकाळी दिवा आणि दिवाळीचा फराळ एकत्र करून ता गोट्यातील जनावरांना दाखवला जायचा आणि एक गाणे म्हणायचे,
दिन दिन दिवाळी ,
गाई म्हैशी ओवाळी
तर अशी गाणे बोलून दिवाळीची सुरवात होयची

हा सगळा दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर ,घरातील दिवसमावळतील बोलायचे. झाले असेल फटाके वाजवून तर बघा पुस्तकाकडे;मग आम्ही म्हणायचो,झाला आमचा अभ्यास मग घरातले बोलायचे, शाळेचा झाला असेल पण घरचा अभ्यास नाही झाला. मग घरातले बोलत जावा अंकलिपी,वही ,पेन्सिल आना आणि बसा अभ्यासाला;मग आम्ही सगळे अभ्यासाला बसायचो आणि पुस्तकाच्या आडणे गप्पा मारायचो, मोठे कोणी दिसले की गपचूप अभ्यास करायचो. परंतु आम्ही आमचा अभ्यास एक ते दोन दिवसात पूर्ण करायचो.आणि बाकी काय “दिवाळी दिवाळी”

खरी मज्जा तर आम्हाला याईची ती म्हणजे, भाऊबीजेला कारण आम्ही भावाला भाऊबीजेला ओवळण्यापेक्षा त्याने काय गिफ्ट आणलाय हेच बगण्यात उत्साही असायचो. आणि त्याने गिफ्ट नाही दिले तर त्याच्या आवडीचे फटाके आम्ही चोरायचो आणि त्याच्या पुढे वाजवायचो. ते थोडे हट्टी पण लाडीक वागणे हे नेहमीच घरात आवडे.

पाडव्याला आमच्यात खास महत्व होते ,त्या दिवशी आमच्यात पुराण -पोळीचा स्वयंपाक केला जायचा,सगळ्या शिवारात पांडव घालाय जायचे हे पांडव म्हणजे एक माडक्याला चुना लावून ते मडक्यात काटी घालून रानात रोवले जायचे. आणि पोळीचा नैवेद्य दाखवला जायचा. आणि याच दिवशी आमच्यात नवीन कपडे घालून मिरवले जायचे.

जेवढे इंद्रधनुष्यत नसतील त्याहून अधिक रंग माझ्या आठवणीतल्या आणि जीवनातल्या दिवाळीत दडले आहेत.ज्याच्या ,आठवणीत पुन्हा मला बालपण जागविला,वाडीला लागलेल्या वेलीला देखील, थोडे खाली झुकवल,
अशीच आनंदाने भरलेली,उत्साहाने सजलेली,पंचपक्वनात नटलेली ,आली माझ्या घरी दिवाळी …

स्नेहल गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button