काल आम्ही दहा किलो शेंगदाणे गाळून आणले. गोडेतेल निघाले चार लिटर. एकशे चाळीस रुपये प्रतिकिलो दराने दहा किलो शेंगदाण्यांची किंमत झाली चौदाशे रुपये. शेंगदाणे गाळण्यासाठी घाणेवाल्याने चारशे रुपये घेतले. प्रतिकिलो चाळीस रुपयांप्रमाणे.
म्हणजे दहा किलो शेंगदाण्यांचे तेल काढण्यासाठी आम्हांला खर्च आला अठराशे रुपये.
थोडक्यात आम्हांला अठराशे रुपयांत चार लिटर तेल मिळाले. म्हणजे प्रत्येक लिटर शेंगतेलाची किंमत झाली साडेचारशे रुपये.
……आणि बाजारात पॅकिंग केलेले शेंगतेल मिळते एकशे सत्तर रुपये. मी स्वतः काढलेले शेंगतेल पेंढेचे पैसे वगळता मला जर चारशे रुपये दराने मिळत असेल तर बाजारात शेंगतेल म्हणून जे तेल मिळते ते नक्की कशाचे असते?
मागच्या महिन्यात मी वीस किलो सूर्यफूलाचे तेल काढून आणले होते. तेव्हाही मला चारशे रुपये लिटरनेच ते पडले होते. मोठ्या कंपन्यांना शेंगदाणे किंवा सूर्यफूलासारखा कच्चा माल वीस टक्केनं स्वस्त मिळत असेल आणि त्यांची उत्पादन किंमत नगण्य असेल,पेंढेचे पैसे असं सगळं गृहीत धरलं तरी तीनशे रुपयांच्या आत एक लिटर शुद्ध तेल तयार होणं शक्य नाही. मग बाजारातून मी सव्वाशे ते दीडशे रुपयांना एक लिटर शेंगतेल किंवा सूर्यफूल तेल म्हणून मी जे विकत आणतो ते नक्की काय असतं?….कशाचं तेल?
सर्वच तेलांच्या बाबतीत हाच नियम आहे , शिवाय आपण घाण्यावर तेल काढून घेतो तेंव्हा ते एकदाच गाळलेले असते , अन बाजारातून आणलेले रिफाईंड तेल मात्र डबल रिफाईंड टिब्बल रिफाईंड असते , ओमेगा ३ गुड कोलेस्ट्रॉल , बॅड कोलोट्रोल च्या जाहिराती , त्याचा खर्च , फॅक्टरी ,ट्रान्सपोर्ट , डिस्ट्रिब्युटर , डीलर , रिटेलर यांचे खर्च जोडले तर या रिफाईंड तेलाचा उत्पादन खर्च १०० रुपयांच्या खाली असल्या शिवाय या कंपन्या धंदा करूच शकत नाहीत
आपणही हा प्रयोग करून पाहाच!….म्हणजे एकदातरी तुम्हांला शुद्ध तेल खायला मिळेल!