आरोग्य

हलाल म्हणजे काय ? हलाल कि झटका ? कोणता मांसाहार योग्य ?

Halal or Zataka? Which meat is good in Marathi ?

हलाला म्हणजे काय जे🍗नॉनव्हेज खातात पण ज्यांना हे माहिती नाही त्याच्यासाठी महत्वपूर्ण हलाल कि झटका 🍗
(अज्ञानापोटी मुसलमानी हलाल पद्धतीने कापलेले मटण खाणाऱ्या हिंदूंसाठी)
ज्यावेळी एखादा मुस्लिम बाहेर मटण खाण्यासाठी जातो त्यावेळी तो आवर्जून विचारतो की मटण हलाल आहे की झटक्याचे ?

हिंदूंना मात्र अजून हा विषय काय आहे ते माहितीच नाही.
मांसासाठी एखाद्या पशूला कापण्याच्या दोन भिन्न पद्धती आहेत झटका व हलाल

झटका पद्धत म्हणजे काय

पशूला झटका पद्धतीने मारले जाते. तलवारीच्या एका घावामध्ये प्राण्याचे शीर धडापासून वेगळे करून पशूला एका झटक्यात मारले जाते.
यामागील शास्त्रीय कारण असे आहे की कोणत्याही प्राण्याच्या संवेदनांचे केंद्र हे मज्जा रज्जु (spinal cord)असतो. हा मज्जा रज्जु लहान मेंदूपासून सुरु होऊन मानेतून पाठीच्या मणक्यातून गेलेला असतो.आपल्या शरीराला होणाऱ्या सर्व वेदना ह्या मज्जारज्जूमुळे शरीराला जाणवत असतात. जोपर्यंत मज्जारज्जू अखंड आहे तोपर्यंत शरीराला सर्व वेदना जाणवत असतात. झटका पद्धतीमध्ये प्राण्याच्या मानेवर वेगाने वार करून सेकंदापेक्षाही कमी वेळात शीर धडापासून वेगळे केले जाते. यामध्ये मज्जारज्जू कापला जातो त्यामुळे साहजिकच संवेदना नष्ट झाल्याने त्या प्राण्याला वेदना जाणवत नाहीत.

हलाल म्हणजे काय (Halal in Marathi)

झटका पद्धतीच्या अगदी विरोधी मुस्लिम हलाल पद्धत आहे. यापद्धतीमध्ये प्राण्याला हालहाल करून मारले जाते. यामध्ये धारदार सुरीने प्राण्याचा हळूहळू गळा चिरायाला सुरुवात केली जाते. गळ्याच्या श्वासनलिका व रक्तवाहिन्या कापून अर्धवट अर्धवट चिरला जातो. यामध्ये प्राण्याच्या मानेकडील मज्जारज्जू (spinal cord )ला धक्का नं लावण्याचा कटाक्ष पाळला जातो. अशा अर्धवट गळा चिरलेल्या अवस्थेत प्राण्याला 10 ते 15 मिनिटं तडफडत ठेवले जाते. मज्जारज्जू अखंड असल्यामुळे त्या प्राण्याला शेवटपर्यंत भयानक वेदना जाणवत राहतात.
तडफडून मरताना त्याच्या आक्रोशामुळे त्याच्या शरीरातील हार्मोनमध्ये देखील नकारात्मक बदल होऊन हलाल मांस खाणाऱ्या व्यक्तीला देखील असे मांस हानिकारक ठरते असे शास्त्रज्ञाचे मत आहे. त्यामुळे हलाल पद्धत ही अशास्त्रीय व क्रूर पद्धत आहे.
आपल्या पूर्वजांना देखील याचे ज्ञान होते म्हणून एखाद्याचा पाशवी पद्धतीने छळ करणे याला ग्रामीण भाषेत हालहाल करणे असे म्हटले जाते.

हे पण वाचा – मांस (चिकन मटन) आणि अंडी खावीत की नाही

झटका पद्धत हळूहळू नामशेष होत आहे. सर्वत्र हलाल चिकन – मटण अश्या दुकानांवर पाट्या लावलेल्या दिसतात. समानांतर अशी मुस्लिम हलाल अर्थव्यवस्था उभी राहत आहे.

अनेक कंपन्यांना आपली उत्पादने विकण्यासाठी हलाल सर्टिफिकेट (Halal Certified) घेण्यासाठी मजबुर व्हावे लागतं आहे. हिंदूंना मात्र अजून हलाल व झटका हा काय प्रकार हे माहितीच होऊ दिले नाहीत. शीख धर्मिय मात्र आजही धर्मशिक्षणामुळे फक्त झटका मटणच खातात हलाल नाही.

तसे हिंदुस्तान वर विदेशी आक्रमणे होण्यापूर्वी कोणीही मांसाहार करत नव्हते पण त्यानंतर जेव्हा सुरू झाला तेव्हा हिंदु खाटीक झटका पद्धतीचे मटण विकायचे. पण आता त्यांनी देखील अज्ञानापोटी मुस्लिम कामगार कामाला ठेऊन हलाल पद्धतीचे मटण विकणे सुरु ठेवले आहे.

सर्वात दुर्देवी व लाजिरवाणा प्रकार म्हणजे हिंदु देवदेवतांच्या जत्रेला #बकऱ्या, #कोंबड्या यांचा पशुबळी देण्यासाठी जो हिंदु देवांना मानत नाही त्या मुस्लिम कसायाला बोलाविले जाते. तो कलमा पढून यजमान हिंदूंसमोर हलाल पद्धतीने हळूहळू गळा चिरून पशूला तडफडून मारतो व यजमान हिंदु स्वतःचे संसाराचे कल्याण होण्यासाठी देवाला प्रार्थना करतो. अशाने कल्याण नं होता त्या तडफडून मरणाऱ्या प्राण्याचा तळतळाट व शाप मात्र नक्की यजमान हिंदूला लागतो.

यामुळे हिंदूंनो एकतर मांसाहारापासून दूर रहावे हा श्रेष्ठ मार्ग आहे. अहिंसा परमो धर्म हा मूलभूत धर्म सिद्धांत आहे. ज्यांना अगदीच जमत नसेल त्यांनी झटका पद्धतीचे मटण खावे. मागणी तसा पुरवठा हा बाजाराचा नियम आहे. झटका मटणाची मागणी वाढली तर ते विक्रेत्यांना उपलब्ध करून द्यावेच लागेल.

पण… पण चुकूनही हलाल मटण खाऊन प्राण्यांच्या आक्रोशात सहभागी होऊ नका ही नम्र विनंती.

Halal in Marathi, halal meaning, halal certification, हलाला क्या है, हलाला क्या होता है, हलाल का अर्थ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button