माहिती

जुनी पेन्शन योग्य कि अयोग्य – Old Pension Scheme Maharashtra in Marathi

Old Pension Scheme in Maharashtra Right or Wrong in Marathi

पेन्शन संपवा , देश वाचवा

सरकारला विनंती आहे की, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेनुसार पेन्शन हवी असेल त्यांना जुन्याच योजनेनुसार पगार देखिल द्यावेत. ६वा व ७ वां पे कमिशन रद्द करावा. आणि तरीदेखील ह्यांना संपावर जायचे असेल तर, महाराष्ट्रातील कोटी दीड कोटी तरुण तरुणी बेरोजगार आहेत, अगदी सध्याच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या निम्म्या पगारात देखिल ते नोकरी करायला तयार आहेत, त्यांना संधी द्यावी.

सरकारी कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले पाहिजे की, तूम्ही नोकरी करून सरकारवर उपकार करत नाही, तर उलट तुम्हाला नोकरीची संधी देऊन सरकार तुमच्यावर उपकार करते.

शेतकरी, कामगार, कष्टकरी, गैरसरकारी लोक
१)यांना काय पेन्शन आहे का?
२)शनिवार रविवार न काम करता पगार मिळतो का?
३)टेबल खालून पैसा मिळतो का?
४)सणवार उत्सव ह्याला सुट्टया मिळतात का?
५)दर दोन महिन्याला कोणती पगारवाढ मिळते का?
६)दिवाळी ला बोनस मिळतो का?
७)पोरांची शाळेची, क्लास ची फी मिळते का?
८)मेडिकल बिल मिळते का?
९)कोनी साहेब साहेब म्हणते का?
१०)दोन चार वर्षांनी फुकटची पदोन्नती मिळते का? नाही ना?

मग तरी आम्ही शेतकरी, कामगार, कष्टकरी संपावर जातो का? नाही ना.

मग कशाला सहन करायची ह्या सरकारी कर्मचाऱ्यांची नाटक? ह्यांनी जर संप मागे नाहीं घेतला तर सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून ह्यांच्या विरोधात आंदोलन करणार. सरकारी कर्मचारी म्हंजे पांढरा हत्ती आहे. वेळेवर “माहूताने” आवर घालावा. नाहीतर राज्य विकावे लागेल ह्यांचे लाड पुरवता पुरवता….

सरकारने भयंकर पगारवाढ केल्याने समाजात आर्थिक विषमता वाढली आहे.
१)सरकारी नोकरीला असणाऱ्या भावाचा बंगला आणि शेतकरी भावाच्या घराला साधे प्लास्टर सुद्धा नाही.
२)सरकारी भावाच्या पत्नीच्या अंगावर तोळे तोळे सोने आणि आमच्या शेतकरी भावाच्या पत्नीचे गुंजभर आहे ते पण बँकेत गहाण पडले आहे.
३)ह्यांची पोरं इंग्लिश मिडीयमला आणि शेतकरी भावाची पोरं सरकारी शाळेत दुपारचा पिवळा भात खायला.
४)ह्यांच्या पोरांना इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेणार आणि आमची पोर बीए बीकॉम करत परत घरी बसणार.
५)यांची पोर कॉलेजला चारचाकी दोनचाकी वर जाणार आमची पोर बस स्टँड वर वाट पाहत बसणार.
६)आम्हीं रात्रंदिवस उन्हातानात काम करणार, रात्रीच्या वेळेस बिबट्या, साप यांची भीती बाळगून आयुष्यभर काम करणार आणि म्हातारपणी संजय गांधी निराधार योजनेचे 1000 ची वाट पाहणार आणि हे सरकारी कर्मचारी म्हातारपणी 30 ते 40 हजार काही काम न करता येणार
अशी भयंकर आर्थिक विषमता समाजात निर्माण झाले आहे. आणि ती मिटवायची असेल तर सरकारने पेन्शन द्यायला नको…
सध्याचे सरकारने असच ठाम राहून पेन्शन बंदीचा निर्णय चालू ठेवावा , जनता तुमच्या पाठीमागे आहे .
विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस – शिवसेना (उद्धव ठाकरे) यांची महाविकास आघाडी सत्तेत असताना यांनी सुद्धा पेन्शन योजनेला विरोध केला होता.

सामान्य नागरिक पूर्णपणे सरकारच्या बाजूने आहे . शिंदे साहेब , गरज पडली तर जनतेला विनंती करा जनता कामकाज करण्यासाठी येईल.

Nirmila Kadam (Sangli)

इंग्रजांच्या काळात हि पेन्शन योजना सुरुवात झाली. त्यामागे लोकांनी सरकारी नोकरी पत्करावी व ब्रिटिश शासनाला मदत करावी हा होता. आता इंग्लंड मध्ये सुद्धा पेन्शन बंद आहे. काँग्रेसने मतांसाठी हि योजना चालू ठेवली. सरकार कडे जर १०० रुपये कर जमा होत असेल तर त्यातील ८० रुपये शासकीय कर्मचारी व पेन्शन वर खर्च होतात. व विकासासाठी कमी निधी उपलब्ध होतो. त्यातुन फ्री औषधे, ऑफिस साठी लागणारा खर्च जसा स्टेशनरी,लाईटबिले, फर्निचर,सरकारी गाड्या,इंधन, टेलिफोन, इंटरनेट, इमारती,त्यांचे मेंटेनन्स यावर ही खुप खर्च होतो. त्यामुळे रस्ते,पाणी,वीज, रेल्वे, विमानतळ,तीन सेनादले, लष्करी साहित्य, रणगाडे,तोफा, लढाऊ विमाने,जहाजे, २० लाख आर्मी सैनिकांचा पगार, पेन्शन यावर कसा खर्च करायचा हा प्रश्न पडतो. त्यामुळे सरकार आर्मीची पण पेन्शन बंद करत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचे गलेलठ्ठ पगार, दर ७ वर्षांनी वित्तआयोगामुळे वाढणारे पगार यामुळे सरकारी तिजोरी फक्त कर्मचाऱ्यांना सांभाळण्यात खर्च होते. विकासाच्या नावाने बोंबाबोंब. आणी सरकार प्राॅव्हीडंट फंडातील रक्कम जरी शेअर बाजार,बाँन्ड, मध्ये गुंतवणूक करत असले तरी त्या गुंतवणूक योजनाच आहेत. स्वतः सरकारी कर्मचारी शेअर बाजार, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात ते चालते. सरकारने केले की पोटशूळ उठतो. आज सरकारी कर्मचाऱ्यांना इतका पगार आहे की त्या पगारात इतर ५ जण नोकरी करु शकतात. सगळे तुप आमच्याच पोळीवर ओतले पाहिजे हा अट्टाहास अनाठायी आहे. आणी परत सरकारी कर्मचारी आपल्या नोकरीला सेवा म्हणून घेतात. सेवा ही निरपेक्ष असते.

स्वाध्याय परिवार,संघ परिवार करतो ती सेवा किंवा भक्ती आहे. ज्याचे दर महिन्याला टरकुन पेमेंट घेतले जाते ती चाकरी किंवा नोकरी आहे. मालक देईल त्यात समाधान मानले पाहिजे. पेन्शन पाहिजे असेल तर सगळे वेतन आयोग नाकारा, महागाई भत्ता नाकारा,बोनस नाकारा, ग्रॅच्युइटी नाकारा, घरभाडे भत्ता नाकारा, कपडे धुलाई भत्ता नाकारा आहे का हिम्मत?

शासकीय नोकरी करुन दुध जरुर प्या परंतु लोकांनी भरलेल्या करांचा उपयोग विकासासाठी होऊ द्या. त्यांचे रक्त शोषू नका.

Anand Marathe (Pune)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button