माहिती

अ‍ॅमेझॉन वर वस्तू विक्री कशी करावी संपूर्ण माहिती

How to Sell Products on Amazon India in Marathi

अमेझॉन वर प्रॉडक्ट्स कसे विकावे – होय, अ‍ॅमेझॉन वर सेल्लिंग करून तुम्ही महिन्याला अमर्याद पैसे कमावू शकता. मी स्वतः एक अमेझॉन चा एम्प्लॉयी आहे आणि मी ऍमेझॉन वर विक्री पण करतो. त्यामुळे या पोस्ट मध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ शकतॊ. अमेझॉन वर वस्तू विकणे खूप सोपे आहे, जर तुम्ही स्वतः काही बनवत असाल किंवा Distributor कडून घेऊन विकणार असाल तर तुम्हाला जास्त नफा म्हणजे प्रॉफिट मिळतो.

तुम्ही अ‍ॅमेझॉन वर राख, शेण, लाकूड, झाडे किंवा माती पण विकू शकता खालील फोटो मध्ये पहा. फक्त गरज आहे ती सुरवात करण्याची. यामध्ये मी तुम्हाला अमेझॉन वर विक्री साठी काय लागते, अमेझॉन  चे चार्जेस काय आहेत, प्रॉडक्ट डिलिव्हरी कशी करायची, आणि रेजिस्ट्रेशन बद्दल पूर्ण माहिती देणार आहे, चला तर मग संपूर्ण माहिती पाहूया.

amazon war vastu vrikri kashi karawi marathi

आता हा वरचा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि मानस काही पण विकतात. अहो पण आपल्या 135 करोड लोकसंख्ये मधून हि प्रॉडक्ट्स घेणारी भरपूर माणसं आहेत. आणि तुम्ही विचार केला नसेल परंतु या असल्या वस्तू अमेझॉन  वर विकून माणसं करोडो रुपये कमवत आहेत. मग मराठी माणसाने मागे का राहायच ?

अ‍ॅमेझॉन वर विक्री साठी काय लागते (Amazon war Vikanyasathi kay Documents Lagatat Marathi)

हा मला सगळ्यात जास्तं  विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि यांचा उत्तर म्हणजे अ‍ॅमेझॉन वर विक्री साठी तुम्हाला रुपये 1000 वर खर्च पण येत नाही. ऍमेझॉन विक्री साठी काय लागते ?

  • ई-मेल आयईडी
  • मोबाईल नंबर
  • GST नंबर
  • अमेझॉन  अकाउंट
  • तुमचा बिझनेस चा किंवा घराचा पत्ता पण चालतो

बस्स ! एवढ्याच 4 गोष्टी लागतात. ई-मेल आयईडी, मोबाईल आणि अमेझॉन अकाउंट तर तुमचे असेलच, फक्त तुमच्या प्रॉडक्ट चा सीए कडून जीएसटी काढून घ्या म्हणजे 2  दिवसात विक्री चालू करू शकाल. GST काढण्यासाठी फक्त ५०० ते १००० रुपयांचा खर्च येतो. त्यापेक्षा जास्त नाही. GST अप्लाय केल्या नंतर 5 दिवसात तुमचा GST नंबर येतो.

अ‍ॅमेझॉन वर रजिस्टर करण्यासाठी इथे क्लिक करा – Amazon Registration

अमेझॉन वर प्रॉडक्ट शिप कसे करावे (Amazon war product ship kase Karawe)

अ‍ॅमेझॉन वर जेव्हा तुम्ही वस्तू विकता तेव्हा ती वस्तू पूर्ण भारतात कोठेही डिलिव्हरी करू शकता. यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार आहेत ते खालील प्रमाणे.

  1. एझीशीप (EasyShip) – या पद्धती मध्ये तुम्हाला फक्त तुमची वस्तू नीट पॅक करून ठेवायची आहे आणि अ‍ॅमेझॉन ने दिलेल्या एक शिपिंग लेबल ला चिकटणाऱ्या पेपर वर प्रिंट करून तुमच्या प्रॉडक्ट वॉर चिटकवावे लागते. त्यानंतर अ‍ॅमेझॉन स्वतः तुमचे प्रॉडक्ट घरून / ऑफिस मधून घेऊन जाईल आणि ते तुमच्या ग्राहकाला पोहचवले जाईल. या साठी 500 grams च्या आतील वस्तूला अंदाजे रुपये 82, खर्च येतो.

2. एफबीए (FBA) – अ‍ॅमेझॉन वरून तुम्ही खरेदी करत असताना पाहिलेलाच असेल कि काही प्रॉडक्ट्स च्या खाली Prime चा लोगो असतो. याचा अर्थ असा कि ते प्रॉडक्ट ऍमेझॉन च्या वेअरहऊस मध्ये आहे आणि अ‍ॅमेझॉन स्वतः त्याच पॅकिंग करून शिप करणार. त्यासाठी तुम्हाला जमेल तेवढे प्रॉडक्ट्स तुम्ही अ‍ॅमेझॉन ला देऊन ठेऊ शकता. या पद्धती मध्ये ग्रहाला वस्तू लवकर मिळते आणि तुमचा बिझनेस देखील वाढतो. या पद्धती साठी थोडे जास्त पैसे मोजावे लागतात. 

3. सेल्फशिप (SelfShip) – या प्रकार मध्ये तुम्हाला ऑर्डर आल्या नंतर तुमची तुम्हाला शिप करावी लागते. म्हणजे तुम्ही पुण्यातून असाल आणि बंगलोर ला वस्तू डिलिव्हरी करायची असेल तर तुम्हाला Bluedart, DTDC, SpeedPost सारख्या कंपनी मधून स्वतः शिप करावे लागेल अंडी त्याची ट्रॅकिंग डिटेल्स ऍमेझॉन ला द्यावी लागतील जेणे करून ग्राहक त्याला ट्रॅक करू शकेल. परंतु जर ग्राहकाला वस्तू नाही आवडली तर ग्राहकाला स्वतः शिप करावी लागते किंवा तुम्हाला त्याची स्वतः तयारी करावी लागते. हे पद्धत खूप कमी लोक वापरतात आणि चांगली पण नाही.

अ‍ॅमेझॉन वर विकण्यासाठी किती फी द्यावी लागते (Amazon Selling Fee Marathi)

अ‍ॅमेझॉन वस्तू विकताना आपणास त्यांना काही प्रमाणात पैसे द्यावे लागतात. का ? कारण आपण त्यांच्या प्लॅटफॉर्म वॉर विकत आहोत आणि ते पेमेंट चा सर्व पार्ट तेच पाहतात. अ‍ॅमेझॉन वर प्रत्येक प्रॉडक्ट साठी वेगवेगळी फी द्यावी लागते. अमेझॉन ने भरपूर रिसर्च करून व्यावसायिकांना कोणत्या गोष्टीत जास्त नफा होतो हे बघून त्यांनी पण त्या वस्तू वर जास्त फी लावली आहे.  खाली आम्ही सर्व नाही पण काही प्रॉडक्ट कॅटेगरी वॉर ऍमेझॉन चे किती टक्के Commission  आहे ते दाखवले आहे.

प्रॉडक्ट कॅटेगिरीअ‍ॅमेझॉन ची फी टक्केवारी
Automotive – Tyres & Rims5%
Baby Products6%
Books2% to 13%
Office Products8%
Apparel कपडे13% to 17%
Backpacks10%
Fashion Jewellery22.50%
Shoes14%
Cables – Electronics, PC20%
Beauty Products4.50%
Furniture10% to 14%

 

या फी व्यतिरिक्त तुमच्या वस्तू वॉर आकाराला जाणाऱ्या टॅक्स म्हणजे GST चे पैसे सुद्धा ऍमेझॉन तुम्हाला देते, तेव्हा तो टॅक्स तुम्हाला स्वतः भरावा लागतो.

अ‍ॅमेझॉन विक्री खरंच परवडते का ? काही तोटे आहेत का ?

प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. तसेच अमेझॉन  विक्रीचे देखील तसेच आहेत. भले दोष तुमचा नसेल परुंत कस्टमर तुम्हाला फसवू शकतो आणि त्यात तुमचे नुकसान होते. काही गोष्टी खालील प्रमाणे.

  • जर अमेझॉन  ने दिलेल्या तारखे पर्यंत तुम्ही जर प्रॉडक्ट शिप केले नाही तर तुम्हाला अ‍ॅमेझॉन कडून फाईन लागतो. आणि तुमचा सेलर हेल्थ खराब होते.
  • जे तुम्ही वेबसाइट वॉर चित्र दाखवले आहे आणि जी माहिती लिहली आहे त्यापेक्षा थोडा जरी प्रॉडक्ट वेगळे पाठवले तर तुमची लिस्टिंग बंद होऊ शकते.
  • दाखवले एक आणि वेगळी वस्तू पाठवली किंवा खराब वस्तू पाठवली तर ते लोक रिटर्न करतात तेव्हा तुम्हाला शिपिंग चार्ज परत मिळत नाही.
  • तुमचे पैसे 7-15 दिवस अडकवून ठेवले जातात.
  • अमेझॉन सेलर पेक्षा जास्त विश्वास कस्टमर वर ठेवते कारण ती जगातील पहिल्या नंबर ची “Customer Centric Company” आहे.
  • काही ग्राहक तुम्हाला फसवून तुमचा तोटा करू शकतात.
  • तुमच्या प्रॉडक्ट वर जर रेटिंग खराब झाली असतील तर ते प्रॉडक्ट कोणी घेणार नाही आणि तुमचे प्रॉडक्ट खूप खाली दिसेल.
  • लिस्टिंग करताना जर तुम्ही चुका केल्या तर तुमचे प्रॉडक्ट वरती दिसणार नाही. ग्राहक नेहमी सर्च केल्या नंतर जे वरती दिसतील तेच प्रॉडक्ट्स खरेदी करतात.

तर असे आहे अ‍ॅमेझॉन वर सेल करण्याचे फायदे आणि तोटे. ऍमेझॉन रजिस्ट्रेशन लिंक

तुम्हाला कोणत्याही मदतीची गरज भासल्यास खाली कॉमेंट मध्ये प्रश्न विचार तुम्हाला त्याचे उत्तर दिले जाईल. हॅप्पी सेल्लिंग 🙂

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button