अभ्यास

पावसाळा निबंध मराठी – Pavsala Nibandh in Marathi

Rainy Season (Pavsala) Essay In Marathi Language

माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध – ओल्या मातीचा वास, वाह ! त्या सुगंधा पुढे कोणतेही अत्तर फिके पडेल. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे तो सुगंध राहिला नाही आता. पावसाळा कोणाला नाही आवडत ? हो आहेत काही अशी लोक ज्यांना पावसाळा नाही आवडत. चिखल, चिकचिक नको वाटते काही लोकांना. खे लोकांना रोज काम निमित्ताने बाहेर फिरावे लागते त्यांनाही नाही आवडत. चला तर मग पावसाळ्यावरील निबंध पाहूया.

पावसाळा निबंध मराठी (Pavsala Nibandh in Marathi Language)

ग्रीष्माने होरपळून टाकले की सर्वांचे लक्ष जाते ते वर्षाराणी कडे. कुठे काळा डाग दिसतो आहे का हे पाहण्यासाठी पुन्हा: पुन्हा: डोळे आकाशाकडे वळतात. काळे ढग वर्षाऋतूचा संदेश घेऊन येतात. आकाशात झेपावणारे पक्षी आनंदाने बागडून सांगू लागतात “पेरते व्हा“.

अचानक एखादे दिवशी पावसाचे थेंब टपकू लागतात आणि सर्वांच्या तोंडून आनंदोद्गार बाहेर पडतात “आला पाऊस आला”. पावसाचे स्वागत लहानथोर सर्व जण करतात. लहानां प्रमाणे मोठ्यांनाही पावसात भिजणे आवडते. गुरे, पक्षी, प्राणी यांनाही वर्षाराणी आनंदित करते. पावसाचे टपोरे थेंब खाली येऊ लागले की मोर पिसारा फुलवून नाचू लागतो आणि पावसाच्या पाण्याने डबकी साचली की बेडकांचे “डराव डराव” गाणे सुरू होते.

केवढा किमयागार हा पहिला पाऊस. भोवतालच्या सृष्टीत केवढा कायापालट झाला होता. आकाशातील काळे अभ्र हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. तृषार्त धरती नववधू सारखी दिसत होती. पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. इतकेच काय झाडात दडलेली, पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडून जणू वर्षाराणी चे आभार मानत होते. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्याचे डोळे तर डबडबले होते. आनंदाश्रू होते ते. असा होता तो पहिला पाऊस !

पण पावसाच्या जोडीला जोराचे वादळ सुटले होते. जिकडे तिकडे पडझडीचे आवाज येत होते. या आवाजावरून काय काय पडले असावे याबद्दल अंदाज बांधले जात होते. पण घराबाहेर पडता येत नव्हते. उलट बाहेरचे पाणी मात्र घरात शिरू लागले. दरम्यान विद्युत पुरवठा बंद झाला होता. आकाशात चमकणाऱ्या विजेला पाहून जणू घरातल्या विजेने आपले तोंड काळे केले असावे त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

पहिल्या पावसाने धरती गंधित होते. ओके-बोके डोंगर हिरवा साज पढवितात. रस्त्यावर काळ्या छत्र्यांची गर्दी होते. ढगांचा गडगडाट व विजांचा चमचमाट करीत पाऊस कोसळतो आणि शेते फुलतात, नद्या वाहू लागतात. धान्य व पाणी यांची सुबत्ता होते. असा हा वर्षाऋतु जीवनाला संजीवनी देणारा आहे.

श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी उन पडे!

अजून काही मराठी निबंध –

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button