केशर खाण्याचे फायदे – केशर हे एका विशिष्ट जातीच्या फुलांतील केशर आहेत. लालसर रंगाचे लांब तंतूचे केशर उत्तम प्रतिचे असते व वजनाला हि जड असते. केशरात करडईच्या फुलांतीलं पराग केसरांची भेसळ केली जाते. खरे पहाता केशर हे काही मूख्य औषध नाही. केशर इतर औषधां बरोवर व अनुपानासाठी वापरले जाते. एक वर्षापेक्षा जूने केशर औषधांत किंवा रंगासाठी वापरले असता उपयोगी पडत नाही.
केशर चे शास्त्रीय नाव क्रॉकस सॅटायव्हस आहे. Keshar Meaning in English Saffron.
केशर मधील पोषण गुणधर्म (Keshar Nutrition Values)
प्रत्येकी 100 ग्रॅम केशर मधील पोषण मूल्य
- कॅलरी – 310
- टोटल फॅट – 6 ग्रॅम
- कोलेस्ट्रॉल – 0 मिलिग्रॅम
- प्रोटीन – 11 ग्रॅम
- सोडियम – 148 मिलिग्रॅम
- कार्बोहायड्रेट – 65 ग्रॅम
- पोटॅशियम – 1724
केशर खाण्याचे फायदे (Keshar Khanyache Fayde Marathi)
1. आतर्व साफ होण्यासाठी व पोटदुखी कमी होण्यासाठी – केशराची गोळी करून योनित ठेवली असता त्रास कमी होतो.
2. आतर्व साफ होण्यासाठी – पाव ग्रॅम केशर व पाव ग्रॅम शुध्द कापूर एकत्र करून पाळी अगोदर २ दिवस घेण्याने आर्तव साफ येतो.
3. गरोदरपणांतील रक्तस्त्राव – १० ग्रॅम गाईच्या लोण्यात २५ मिली ग्रॅम केशर खलून पिण्यास देण्याने रक्तस्त्राव थांबतो.
4. धातुविकार – जुन्या तुपांत केशर खलून ३ दिवस पिण्यास द्यावे. (३ दिवस पर्यंत आंबट, तिखट, तेलकट वर्ज्य मुत्राघात रात्री १ पेला पाण्यात केशर भिजत घालावे. सकाळी त्याच पाण्यात भिजलेले केशर खलून मध घालून पिण्यास द्यावे.
5. डोकेदुखी – गाईच्या तुपात केशर खलून त्यांत बदाम उगाळून त्या गंधाचे नस्य करावे. कापूर व चंदन उगाळून त्यात केशर खलून मस्तकावर लेप केला असता डोकेदुखी थांबते.
6. लहान मुलांचे सर्दी पडसे – १ चमचाभर दूधात केशराच्या २ काड्या खलून ते दूध पाजावे व थोड्या दुधाचा छातीवर व कपाळावर हात चोळावा.
7. जंत – समभाग केशर व कापूर घेऊन १ चमचा मधात खलून चाटण करावे.
8. मुलांची पोटफुगी, पोटदुखी, जुलाब – गरम दुधांत केशराच्या २ काड्या खलून दूध पिण्यास द्यावे व त्याच दुधाचा हात पोटावर फिरवावा. मुलांना साती खाण्याच्या सवयीमुळे झालेला पंडूरोग – केशराच्या २ काड्या, लेंडी पिंपळी, जेष्ठीमध व निशोत्तर याचा काढा करून मुलतानी मातीला काढ्याची ४ पूटे देऊन ती माती मुलास खाण्यास द्यावी.
9. मोतिबिंदू (अहिरा) – शुध्द मधांत केशर खलून त्याने अंजन करावे. रक्तस्त्राव ( कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणावर झालेला) – केशर मधांतून चाटवावे.
10. शिघ्र व सुलभ प्रसूती – केशराची गोळी करून प्रसूत होण्याच्या स्थितीत असलेल्या स्त्रीच्या गळ्यांत बांधावी.
11. रक्तपित्त – केशर बकरीच्या दुधात शिजवून ते दूध पिण्यास द्यावे. पथ्य -दुध भात खावा.
12. पिनस, अर्धशीशी- गाईच्या तुपात १ केशराची कांडी खलून त्या दूधाचे दोन थेंब दोनही नाकपुडीत टाकावेत.
13. वाळंतिणीस अंगावर दुध जास्त येण्यासाठी – केशर दुधात खलून स्तनावर लेप करतात.
केशर खूप महाग का असते (Why Keshar is Expensive Marathi)
जगातील सगळ्यात जास्त महाग मसाला म्हणून केशर ला ओळखले जाते. प्रत्येक केशरच्या फुलामध्ये फक्त तीन कलंकअसतात. हे पराग कण फुलापासून वेगळे झाल्यावर त्यांचा रंग आणि चव टिकवण्यासाठी ते वाळवले जातात. फुलांचा इतका छोटा भाग वापरला जात असल्याने, 450 ग्रॅम केशर तयार करण्यासाठी 75,000 केशर ची फुले लागतात. आणि हे सगळी प्रक्रिया कोणत्याही मशीन द्वारे करत नाहीत यासाठी पूर्णपणे मनुष्यबळ लागते त्यामुळे केशर खूप महाग असते.
अजून वाचा –
Really great information