आरोग्य

जवस व जवसाची चटणी खाण्याचे फायदे – Javas Khanyache Fayde

Linseed / Flax seed Benefits in Marathi

जवस व जवसाची चटणी खाण्याचे फायदे – जवस हे एक वनस्पती-आधारित प्रकार आहे जे आरोग्यासाठी चांगली चरबी, अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबर पुरवते. हे पीक प्राचीन इजिप्त आणि चीन मधून आलेले आहे. आशियात खंडा मध्ये हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधात याचा वापर केला जातो.

आजच्या काळात जवसाचे बी हे बियाणे, तेल, पावडर, गोळ्या,आणि पीठाच्या स्वरूपात मिळते. बद्धकोष्ठता , मधुमेह , उच्च कोलेस्ट्रॉल , हृदयरोग , कर्करोग आणि आरोग्याच्या इतर समस्या टाळण्यासाठी लोक आहारात जास्ती करून चटणीचा वापर करतात.

जवस ला मराठी मध्ये अळशी सुद्धा म्हणतात. जवस ला हिंदी मध्ये “अलसी” म्हणतात आणि इंग्लिश मध्ये “Linseed” किंवा “Flaxseed” म्हणतात.

Javas Chatni Khanyache Fayde
Image Source – Dreamstime.com

जवस खाण्याचे फायदे (Javas Khanyache Fayde Marathi)

 • जवसाचे बी व तेल औषधींत वापरले जाते. तेलास जवसाचे किंवा जवसाचे तेल म्हणतात.
 • निद्रानाश – अळशीच्या तेलांत एरंडेल तेल टाकून काशाच्या भांड्यात खलून त्या तेलाने अंजन करावे.
 • भाजल्याचा व्रण – अळशीच्या तेलांत चुन्याची निवळी घालून खलून एखाद्या पक्षाच्या पिसाने हळूवार पणे भाजलेल्या व्रणावर लेप करावा. नियमित पणे असा लेप करण्याने भाजल्याचा डाग सहसा रहात नाही.
 • मुत्रमार्गाचे विकार – अळशीचा पाव भाग काढा करुन द्यावा.
 • मुत्रमार्गाचे विकार – जवसाचे चूर्ण साखर घालून द्यावे.
  -अळशीकूट व जेष्ठिमधकूट उकळत्या पाण्यात भिजत घालून गाळून थोडे थोडे पिण्यास द्यावे.
 • कफ दाटल्यास – अळशीचे/जवसाचे पीठ करुन त्याने छातीस शेक करावा.
 • पोटांत मूरडा – अळशीचा काढा करुन गाळून द्यावा.
 • लघवितून रक्त पडत असता – वरील काढा द्यावा.
 • गरोदर स्त्रिस – पहिल्या महिन्यांत उलटी होत असेल व चक्कर येत असेल तर व धातूविकारांत काढा करून घ्यावा.
 • बद फुटून साफ होण्यास – अळशी वाटून त्यांत हळद घालून थोडे गरम करुन पोटीस बांधावे.
 • कफ- अळशीचा काढा करुन थंड झाल्यावर त्यांत मध घालून द्यावा. अळशी गरम करून तीचा छातीस शेक करावा.
 • पिकलेल्या सुजेवर – अळशी, गुग्गुळ, निवडुंगाचा चीक, कोंबडीची किंवा पारव्याची विष्ठा, उसाचा क्षार एकत्र करुन पिकावण म्हणून लावावी.
 • पिकावण – जवसाचे पीठ दुधांत घट्ट कालवून त्यांत हळद घालून गरम करुन ५/७ वेळा बांधावी व वर खायचे पान बांधावे.
 • मुळव्याध – अळशीचे/जवसाचे तेल ५० मिली. प्रमाणात दिवसांतून २ वेळा घ्यावे.
 • मुत्रविकारांत – अळशीपूड, अळशीच्याच काढ्यातून किंवा साखरेतून १/२ वेळा घ्यावी.
 • रेचक – २ ते ४ थेंब जवसाचे तेल घ्यावे. या तेलाचा विरेचन, व्रणरोपणास तसेच मुळव्याधित उत्तम प्रकारे फायदा होतो.
 • खोकला – अळशीचा फांट द्यावा. मुठभर अळशी, ५ ग्रॅ. जेष्ठिमध, १ लिंबाची फोड, साखर, १० पेले आधणाच्या पाण्यात किमान ४
  तास भिजत घालावी, हे पाणी दिवसातून ३/४ वेळा घ्यावे.
अळशी काही प्रमाणात पोटास हानिकारक असल्याने मध व धणेपूड या बरोबरच घ्यावी. तेल रेचक असल्याने बळ पाहून प्रयोग करावा.

अजून वाचा

ओवा खाण्याचे फायदे

लसूण खाण्याचे फायदे आणि माहिती

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button