
उडीद डाळ खाण्याचे फायदे – उडीद हे एक पौष्टीक धान्य आहे. हे वरून काळे उडीद दिसणारे धान्य आंतून साल काढल्यावर
सफेदच असते. उडदाची डाळ भिजल्यावर किंवा डाळीचे वरण केल्यावर थोडे चिकट होते. मिठाऐवजी उडदाच्या रोपाची राख भातांत घालण्यासाठी वापरतात.
खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात भारतात उडीद डाळ एक महत्त्वाची डाळ आहे. तामिळनाडूच्या नागापट्टिनम, तिरुवारूर, कुडलूर, थुथुकुडी, तिरुनेलवेली आणि विलुपुरम जिल्ह्यात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आंध्र प्रदेश मध्ये गुंतूर जिल्हा उडीद निर्मितीसाठी प्रथम क्रमांक वर येतो.
उडीद मध्ये खूप प्रमाणात प्रथिने असतात (२५ग्रॅम/१००ग्रॅम), तसेच पोटॅशियम (983mg/100g), कॅल्शियम (138 mg/100g), Iron (7.57 mg/100g), Niacin (1.447 mg/100g), Thiamine (0.273 mg/100g), and riboflavin (0.254 mg/100g). यामध्ये भरपूर प्रमाणात “अमिनो ऍसिड” देखील असते.
या डाळी ला हिंदीमध्ये उडद आणि इंग्लिश मध्ये ब्लॅक ग्राम किंवा “Vigna mungo” म्हणतात.
उडीद डाळ खाण्याचे फायदे (Udid Daal Khanyache Fayde Marathi)
- अरूचीत – उडदाचा पापड भाजून अथवा तळून खावा.
- घशाची नाडी आखडणे, कर्णनाद (कानात आवाज होणे), कानाचा ठणका, तोंडाचा लकवा (आदित), – मषादि सप्तक काढा घ्यावा. उडिद, बला, खपाट, कोतच, कतुपा नावाचे गवत, रास्ना, अखगंधा व एरंडमुळ हे अर्धवट कुटून त्यांचा अष्टमांश काढा तयार करावा व गाळून घेवून त्यांत हिंगपूड व सैंधर्व चुर्ण घालून शक्यतो गरम गरम घ्यावा.
- शक्तीवर्धक – उडदाच्या डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ व पिंपळी चुर्ण प्रत्येकी ५० ग्रॅ.घेऊन एकत्र करावे त्यांत १०० ग्रॅम गाईचे तूप घालून गॅस / शेगडीवर गरम करावे. त्यानंतर त्यांत २५० ग्रॅम साखर व अर्धा लिटर पाणी घालून शिजवून घ्यावे. घट्ट झाल्यावर त्याचे ५० ग्रॅम वजनाचे लाडु बनवावेत. रात्री झोपताना हा एक लाडु खावा व त्यावर एक ग्लास दुध प्यावे. (हा प्रयोग चालू असेपर्यंत आंबट, खारट, तेलकट पदार्थ वर्ण्य करावेत.)
- पांढरे कोड – उडीद वाटून ते कोड असलेल्या जागी चोळावेत.
- अर्दित – (तोंडाचा लकवा) – ४० ग्रॅम उडीद डाळ रात्री पाण्यात भिजत घालावी, सकाळी डाळ उपसुन त्यात चिमटीभर मीठ, लहान आल्याचा तुकडा व मोहरीभार हिंग घालून वाटावी व त्याचे तुपांत वडे तयार करुन रोज सकाळी हे वडे लोण्याशी खावेत.
- शक्तिवर्धक, धातूवर्धक – उडदाची डाळ भाजून दळून पिठकरावे. जितके पिठतितकेच साजूक तुप घेऊन त्यांत पिठखरपूस भाजून घ्यावे, नंतर त्यांत त्याच्या दुप्पट साखर घालून अंदाजे ४० ग्रॅम वजनाचे लाडु तयार करावेत. पाचनशक्ति पाहून रोज अर्धा ते एक लाडु खावा. – सालम सफेद मुसळी, शतावरी, गोखरु , तालीमखाना प्रत्येकी ३० ग्रॅम वेलची, तमालपत्र, मिरे, पिंपळीमुळ, लेडि पिपळी प्रत्येकी २० ग्रॅम जायफळ, जायपत्री, लवंग प्रत्येकी ५ ग्रॅम, बदाम व पिस्ते प्रत्येकी १०० ग्रॅम उडदाचे डाळीचे पिठ १ किलो, साखर २ किलो, साजूक तुप दिड किलो घेऊन त्याचे ५० ग्रॅम वजनाचे लाडु तयार करुन रोज सकाळी एक लाडु खावा.
- नस्यरोग – (नाकाचे रोग) – उडदाचे पिठ, कापूर व लाल रेशमी कापडाची राख पाण्यात कालवून कपाळावर लेप करावा.
- धातु विकार – उडदाच्या डाळीचे पिठ किमान १० ते १५ ग्रॅम घेऊन गाईच्या दुधात वाफवून त्यांत साजुक तुप घालून गरम गरम ७ दिवस घ्यावे.
- धातुवर्धक – उडदाची डाळ वाटून दह्यात कालवून त्याचे तिळाच्या तेलात वडे करून खावेत.
- खांदा दुखावल्यास – उडदाच्या लगद्याचे नस्य द्यावे. उडदाचे तेल व लसूण एकत्र गरम करून त्या तेलाने मसाज करावा,
- तोंडाचा लकवा, अरुची, अशक्तपणा, क्षय, अंगदुखी – डाळ पाण्यात भिजत घालून वाटावी. नंतर त्यांत मीठ, मिरपूड, हिंगपूड, जिरेपूड व आले, लसुण ठेचुन टाकून मिश्रण तयार करावे. याचे वडे तेलांतकिंवा तुपांत बनवून खावेत.
अजून वाचा –
Chaan mahiti
Good Information