आरोग्य

ताप आल्यास घरगुती उपाय – Taap Gharguti Upay

Fever (Taap) Home Remedies in Marathi

ताप आल्यावर काय करावे, घरगुती उपाय – दिवसभर आपल्या शरीराचे तापमान नेहमी बदलत असते. ताप का येतो ? ताप म्हणजे एखाद्या आजाराशी झुंज देण्यासाठी शरीर ताप वाढवते. ताप हा जास्त करून विषाणू किंवा जिवाणू संसर्गामुळे होतो. लहान मुलांमध्ये ताप येत असल्यास उशीर ना करता डॉक्टर्स चा सल्ला घ्या. ताप आल्यावर भरपूर पाणी प्या जेणेकरून शरीराला प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.  इबुप्रोफेन (अ‍ॅडविल) आणि एसीटामिनोफेन (टायलेनॉल) या सारखी ताप कमी करणारी औषधे देखील तापाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. Taap Meaning in English is Fever.

ताप असताना काय खाऊ नये 

  • ताप आल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ जसे कि चहा, कॉफी किंवा कोणतेही थंड पेय पिऊ नका.
  • ताप असताना कोणतेही मसालेदार पदार्थ खाऊ नका त्यामुळे तुमचे तुमची पचन संस्था अजून खराब होते.
  • ताप आल्या नंतर फायबर असलेले पदार्थ म्हणजे गव्हा पासून बनलेले पदार्थ किव्हा ब्रेड खाणे टाळा.

ताप किती असावा (Taap kiti Asawa)

Taap Gharguti Upay Marathi

ताप किती असावा हा खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. माणसाचे नॉर्मल शरीराचे तापमान हे 37 डिग्री (37 degrees Celsius) असावे. तुमचे जर शरीराचे तापमान 38 किंवा  39 च्या वॉर जात असेल तर तुम्हाला ताप झालेला आहे. डॉक्टर्स चा सल्ला घेऊन आपली काळजी घ्या. बाजारा मध्ये किमान रुपये 500 च्या आसपास चांगला इलेक्ट्रिक थर्मामिटर मिळतो तो नेहमी आपल्या घरात ठेवा. शरीराचे तापमान नेहमी 36.5 ते 37.5 डिग्री मध्ये असावे.

ताप आल्यास घरगुती उपाय (Taap alyas gharguti Upay Marathi)

1. बारीक ताप येत असल्यास कडूनिंबारिष्ट घ्यावे. पाव किलो कडूनिंबाची साल रात्री भिजत घालावी. सकाळी भिजलेल्या सालीत चार तांबे पाणी घालून ते पाणी उकळवावे. त्यात पाव किलो गूळ, एक चमचा जिरे, एक चमचा काळी मिरी टाकून ते मिश्रण चांगले उकळवून आटवावे. आटवून एक तांब्या करावे. (सावरीची फुले मिळाल्यास चार फुले उकळताना टाकावीत.) हे थंड पाणी बाटलीत भरून ठेवावे. एक महिन्यांनी हे बाटलीतील कडूनिंबारिष्ट दिवसातून दोन वेळा एक चमचा हे कडूनिंबारिष्ट + एक चमचा पाणी एकत्र करून घ्यावे.

2. केव्हा केव्हा ताप येऊन गेल्यावर खूपच अशक्तपणा वाटतो. भूकसुद्धा नीट लागत नाही. अशा वेळी रात्री एक वाटी पाण्यात तीन चमचे जिरे भिजत घालावेत. सकाळी अनेशापोटी हे पाणी गाळून घ्यावे व चिमूटभर साखर टाकून प्यावे.

3. हिवतापावर आणखी एक उपाय म्हणजे मिऱ्याचे दहा दाणे घेऊन त्यात तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घालून द्यावा. असे आठ दिवस करावे. दिवसातून हे औषध एकदाच प्यावे.

4. आठ मियांचे दाणे थोडेसे ठेचून ते एक वाटी पाण्यात टाकून उकळवावे. उकळवून पाव वाटी करावे. हिवताप झालेल्यांना दिवसभर दोन दोन चमचे हे पाणी- हा काढा दिल्यास हिवताप जातो.

5. साधा ताप येत असल्यास अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा साखर व पाव चमचा तव्यावर भाजलेली डिकेमाली एकत्र कुटून ती चिमूटभर रात्री झोपताना व सकाळी घ्यावी.

6. ताप उतरण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात एक चमचा धने व सुंठीचा लहान (पेराएवढा) तुकडा टाकून ते पाणी आटवून, पाव ग्लास करावे व पिण्यास द्यावे. म्हणजे ताप लवकर उतरतो.

7. तापामध्ये पुष्कळ वेळा तहान फार लागते. अशा वेळी चार लवंगा टाकून त्या थोड्या खरंगटाव्या. दोन कप पाणी घेऊन त्यात या लवंगा टाकून पाणी उकळवावे व एक वाटी करावे. असे पाणी प्याल्याने तहान थांबते.

8. लहान मुलांना ताप पुष्कळ वेळा चटकन चढतो. अशा वेळी कांदा किसून टाळूवर थापून ठेवला की ताप उतरतो.

9. ताप चढला तर मिठाच्या पाण्याची घडी कपाळावर ठेवली तर ताप उतरण्यास मदत होते.

10. दोन वाट्या पाणी घेऊन एक चमचा भरून बडीशेप टाकून पाणी उकळवून एक वाटी करावे व ते घेतल्यास ताप जातो.

11. ताप चढल्यास गरम पाण्यात पाय सोडून दहा मिनिटे बसणे. बसता आले नाही तर पाय पाण्यात झोपलेल्या अवस्थेत ठेवण्याचा प्रयल करणे. ताप उतरतो.

12. ताप उतरून सारखा घाम येत असल्यास ओवा भाजून त्याची पावडर करावी. ती अंगाला चोळावी.

13. ताप चढल्यास, डोके दुखत असल्यास चंदन उगाळून त्यात थोडे केशर व कापूर घालून कपाळावर लेप द्यावा.

14. ताप गेल्यावर अशक्तपणावर रोज सकाळी पाच-सहा मनुका बिया काढलेल्या खडीसाखरेबरोबर खाव्यात.

15. ताप उतरण्यासाठी बेलाच्या मुळाची साल + बेलाची वाळलेली पाच-सहा पाने घेऊन आठ वाट्या पाण्यात हा काढा करून तो आटवून एक वाटी करावा. दिवसातून दोन वेळा द्यावा.

16. तापाच्या उष्णतेचा डोक्यावर परिणाम होऊ नये, म्हणून मूठभर दूर्वा स्वच्छ धुऊन त्यात मूठभर तांदूळ घालावेत. दोन्ही एकत्र वाटावे. त्याचा लेप मस्तकावर द्यावा.

17. शरीराची आग होत असेल तर दूर्वांचा रस दोन चमचे, एक चमचा खडीसाखर पावडर हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे.

18. ताप असल्यास एक कापूरवडी विड्याच्या पानातून खावी. घाम येऊन ताप उतरतो.

19. ताप आल्यास तुळशीची आठ-दहा पाने स्वच्छ धुऊन घेऊन त्याततीन-चार मिरेदाणे ठेचून टाकावेत. आठ वाट्या पाण्यात हे सर्व टाकून काढा आटवून एक वाटी करावा. रात्री झोपण्यापूर्वी गरम गरम प्यावा.

20. ताप आल्यास दोन चमचे तुळशीचा रस दिवसातून दोन वेळा घ्यावा.

अजून वाचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button