आरोग्य

पोटातील जंत होणे घरगुती उपचार – Jant Gharguti Upay

Worms (Jant) in Stomach Home Remedies Marathi

पोटातील जंत होणे, लक्षणे, कारणे आणि घरगुती उपचार – ग्रामीण भागात लहान मुलांमध्ये जंत होण्याचे प्रमाण 70 ते 80 टक्के आहे. भारतात प्रत्येक भागात हे उद्भवणारी समस्या आहे. आपण जे जेवण जेवतो ते पोटातील या अळ्या म्हणजे जंत ते खाऊन टाकतात, त्यामुळे आपल्या शरीराला पोषण मिळत नाही आणि अशक्तपणा आणि कुपोषितपणा वाढत जातो. लहान मुलांची नखे वारंवार कापणे खूप गरजेचे आहे.

जंतांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पचनसंस्थे मध्ये वाढणारे तर दुसरे म्हणजे यकृत किंवा स्नायू वगैरे ठिकाणी वाढणारे. पण साधारणपणे आपल्या पचनसंस्थेत वाढणा-या जंतांनाच आपल्याकडे जंत म्हणण्याची पध्दत आहे. या पोस्ट मध्ये आपण फक्त पचनसंस्थेच्या जंतांबद्दल माहिती करून घेऊया आणि  पोटातील जंत होण्याची लक्षणे, जंत होण्याची कारणे आणि काही घरगुती उपचार पाहूया.

पोटात जंत होण्याची कारणे (Potat Jant Honyachi Karane)

अस्वच्छता हे जंत होण्या मागचे सर्वात मोठे कारण आहे. सौच करून झाल्यानतंत्र गुदद्वाराची जागा चांगल्या पाण्याने धुण्याची सवय लावून घ्यावी. अजून काही कारणे –

 • कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
 • विष्ठेची योग्य वेळी विल्हेवाट नं लावणे
 • कच्चे मांस खाणे
 • स्वच्छता ना बाळगणे
 • दूषित पाणी पिणे किंवा अस्वच्छ अन्न खाणे
 • विषाणू ची बाधा झालेल्या प्राण्याला हात लावणे

stomach Jant Gharguti Upay marathi

पोटातील जंत होण्याची लक्षणे (Potatil Jant honyachi Lakshane Marathi)

काही जंत हे रक्तावाटे फुफुसापर्यंत सुद्धा येतात त्यामुळे वारंवार खोकला सुद्धा येतो. त्या वेळी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.

 • गुदद्वार जवळ खाज सुटणे किंवा सतत गुदगुल्या होणे
 • पोटात गोळा येणे किंवा सारखा गॅस होणे
 • वजन कमी होणे
 • भूक न लागणे, अशक्तपणा आणि पोटदुखी
 • अतिसार, उलट्या आणि मळमळ
 • लघवी करताना वेदना होणे

पोटात जंत होणे घरगुती उपचार (Jant Gharguti Upay Marathi)

जंतांवर बेंडझोल गोळया चांगल्या प्रमाणात गुणकारी आहेत. जंत वर काही आयुर्वेदिक औषधे म्हणजे वावडिंगाचा, विडंगारिष्ट, कल्केरिया कार्ब, सीना, नेट्रम मूर, पल्सेटिला याचा वापर करू शकता.

1. लहान मुलांना जंत झाल्यावर एक चिमटी जियाची पावडर व एक चिमटी वावडिंगाची पावडर एकत्र करून ती दोन चिमट्या गुळातून म्हणजे दुप्पट गुळातून दिल्यास (कालवून) त्याच्या गोळ्या करून एक वेळेला हे सर्व मिश्रण दिल्यास जंतविकारापासून सुटका होते. तीन तेचार दिवस रोज सकाळी उठल्यावर अनेशापोटी असे औषध तयार करून दिल्यास हा विकार नाहीसा होतो.

2. कृमी होण्याची ज्यांना सवय आहे अशांनी चार मिऱ्याचे दाणे सकाळी, चार मिऱ्याचे दाणे संध्याकाळी असे चावून चावून खावे. असे तीन-चार दिवस करावे.

3. पोटात कृमी झाल्यास कडूनिंबाची दोन ओंजळी फुले घेऊन ती एक-दोन तांबे भरून पाणी घेऊन त्यात टाकून उकळवावीत. उकळवून हे पाणी पाव तांब्याभर करावे. हा निंबार्क दिवसातून तीन वेळा, एका वेळी तीन चमचे याप्रमाणे घ्यावा.

4. लहान मुलांना जंत वारंवार होतात. अशा वेळी एरंडेल तेल एक चमचा, एक कप कोया चहातून द्यावा. सकाळी उठल्यावर तोंड
धुतल्यावर द्यावा. म्हणजे तीन ते चार तासांनी शौचास साफ होऊन जंत झालेले असल्यास ते पडतात. महिन्यातून दोन वेळा तरी असे करावे. तसेच रात्री झोपताना वावडिंगाची पावडर एक चमचा व एक चमचा मध असे मिश्रण प्यावे. भरपूर पाणी प्यावे. असे तीन दिवस केल्यास जत पडतात व आराम मिळतो.

5. लहान मुलांना जंत झाल्यास रोज सकाळी उठल्यावर तोंड धुतल्यावर लसणाच्या दोन पाकळ्या खाण्यास द्याव्यात. तसेच जास्त जंत झाले असल्यास लसणाच्या पाकळ्यांची माळ गळ्यात घालावी.

6. लहान मुलांना जंत झाले असल्यास एक चिमटी धन्याची पावडर, अर्धा चमचा मधातून द्यावी.

7. जंत झाले असल्यास अर्धा चमचा चिकणी सुपारीची पावडर रोज सकाळी उठल्यावर तोंडात टाकून त्यावर गरम पाणी प्यावे.

8. जंत झाल्यास तीन ते चार काड्या केशर घेऊन त्यात कापराची लहान एक वडी घालून एक चमचा मधात खलून हे चाटण घ्यावे.

9. रोज सकाळ, संध्याकाळ एक चमचा ओवा- पाव चमचा साजूक तूप+ थोडेसे सैंधव असे खावे.

10. आंब्याची कोय भाजून तिचे चूर्ण करावे. एक चमचा हे चूर्ण + एक चमचा मध घालून हे चाटण दिवसातून दोन वेळा द्यावे.

11. जंत झाल्यास डिकेमाली एक चमचा मधातून द्यावी.

12. कुड्याची साल ताकात उगाळून एक चमचा द्यावी.

13. एक वाटी पाणी घेऊन त्यात थोडे विडंग टाकून काढा पाव वाटी करावा. थंड झाल्यावर त्यात कोरफडीच्या पानांचा अर्धा चमचा रस टाकून हे मिश्रण प्यावे.

14. शेवग्याच्या वाळलेल्या शेंगांतील बियांचे चूर्ण एक चमचा, एक चमचा मधातून असे आठ दिवस घ्यावे.

15. खाजकुयलीच्या शेंगांवरील कूस काढून त्यात गूळ घालून हे मिश्रण अर्धा चमचा रोज याप्रमाणे आठ दिवस घ्यावे. (हा पोटातील जंत संपविण्या साठी रामबाण उपाय आहे) टीप – कुसळे काढताना ती दुसरीकडे उडणारा नाहीत याची खबरदारी घ्यावी नाही तर खूप खाज सुटेल.

16. कारल्याच्या पानांचा रस अर्धा चमचा+ एक चमचा एरंडेल तेलात घालून घ्यावे.

17. सुपारीची पावडर अर्धा चमचा + एक चमचा लिंबाचा रस हे मिश्रण घ्यावे. नंतर एरंडेल तेल एक चमचा घ्यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button