अभ्यास

माझी आई निबंध मराठी – Mazhi Aai Marathi Nibandh

Mazhi Aai Marathi Essay in Marathi

माझी आई मराठी निबंध

कवी यशवंतांनी आईची थोरवी गाताना म्हटले आहे “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” अगदी खरे आहे ते! मातेच्या प्रेमाची कशाचीही तुलना नाही. सत्ता, मत्ता आणि विद्वत्ता सारे ह्या जन्मा पुढे क:पदार्थ आहेत. म्हणून तर कुणापुढे न वाकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या आई समोर नतमस्तक होत असे. तसेच महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज हेही श्रेष्ठ मातृभक्त होते.

मातेच्या वाचल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच आढळते. मातेच्या वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीन स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला तो ओला तुकडा आधी भरवते. प्रसंगी आपल्या वात्सल्याच्या पोटी माता आपल्याला प्राणांचीही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत उदाहरण म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरुज!

माता आपल्या लेकरासाठी काय करत नाही? ती त्याला जन्म तर देतेच आणि सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती नयनांचा दिवा व तळहातांचा पाळणा करून सर्वतोपरी संभाळते. ती त्याला खाऊ-पिऊ घालून त्याचे संगोपन करते व त्याचबरोबर त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगून ती त्याचे कुसुम कोमल मन फुलवते आणि त्यावर सुसंस्कार घडवते. शिवाजी, विनोबा, बापूजी यांसारख्या मानव श्रेष्ठांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेला दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्त सांगतात “एक माता ही सहस्त्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे!”

जेव्हा आपण डोळे उघडलेले नसतात तेव्हा पासून आयुष्याच्या प्रत्येक संकंटांवर मात करण्यासाठी माझ्या आई ने मला रस्ता दाखवलेला आहे. लहान पाणी केसाचा भांग पाडताना, रात्री जागून अभ्यास करून घेताना आणि माझ्या आधी लवकर उठून स्वयंपाक बनवून घर आवरताना मी माझ्या आई ला कधीच विसरू शकत नाही. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत चा तिचा प्रत्येक मिनिट माझ्या संगोपनावर खर्च होतो.

कधी कधी ती माझ्या चुका दाखवून खूप रागावते आणि वडिलांना सुद्धा रागवायला सांगते, तेव्हा खूप राग येतो. परंतु काही वेळाने ती स्वतः परत प्रेमाने जवळ घेऊन कुर्वाळते. या जगात आपली चूक दाखवणाराच आपला खरा मित्र असतो. वाईट वळणांची स्तुती करणारा मित्र हा नेहमी आपल्या अधोगतीस प्रवृत्त करतो. 

मला आठवतेय मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी, परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक उलट्या व्हायला लागल्या. मी परीक्षेला घाबरायचे कशी-बशी परीक्षा संपून मी घरी आले. आईने ओळखले कि मला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला शाळाबाह्य अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भीती वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने म्हणूनच मनात येते “न ऋण जन्मदेचे फिटे”

मातेचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मुनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे ते आपल्यावर कृपा प्रसादाची खैरात सदैव करत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षा ही माता श्रेष्ठ वाटते. म्हणूनच कवी म्हणतात “आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही”

अजून काही मराठी निबंध

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button