आपल्या शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी का केलेली आहे ?
कारण ताक हे आपल्या शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीराची प्रतिकाशक्ती वाढवण्यास मदत करते.ताकाचे नेहमी सेवन केल्याने शरीर बलवान होते.
इतकेच नव्हे तर , जर आपण सलग तीन दिवस काही न खाता जर ताक पीत राहिले तर आपल्या शरीराचे पंचकर्म होते अर्थात शरीरातील चरबी कमी होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात.
ताका मध्ये विटामिन B12, कैल्शियम,पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फायद्याचे असतात.ज्यांना पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने हे होणारे आजार नाहीसे होतात. तसेच ताक प पिल्यानंतर शरीराची झीज ९० टक्के भरून निघते आणि शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते.
ताक पिण्याचे हे काही फायदे जाणून घेऊया आणि परदेशी कोल्ड्रिंक पिणे थांबूया ..
१) ताक पिल्यामुळे शरीराचा लठ्ठपणा कमी होतो.
२) सारखा लघवीचा त्रास होत असेल तर ताकात थोडे मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
३) दह्याचे पाणी किंवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे कमी होते.
४) ताकामध्ये ओवा टाकून पिल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
५) ताकामध्ये गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
६) जायफळ पूड ताकात टाकून पिल्यास डोकेदुखी कमी होते.
७) रिकाम्या पोटी ताक पिल्याने पोटदुखी बरी होते.
८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून पिल्यास सतत होणाऱ्या पित्ताचा त्रास कमी होतो.
९) लहान मुलांना दात येताना त्यांना दररोज ४ चमचे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
१०) महत्वाचे म्हणजे तीन दिवस जर इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.
हिंगुजीरयुतं घोलं सैन्धवेन च संयुतम् ।
भावप्रकाश
भवेत् अतीव वातघ्नं अर्शोऽतिसार हृत्परम् ।
रुचिदं पुष्टिदं बल्यं बस्तिशूलविनाशनम् ।।
अर्थ – भाजलेले जिरे, सैंधव मीठ व हिंग मिसळलेले ताक अतिशय वातशामक असते. मुळव्याध सारख्या रोगात उत्तम असते, अतिशय रुचकर आणि पौष्टिक असते, ताकद वाढवते व मूत्राशयासंबंधित असणार्या वेदना दूर करते.
ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेले आहे त्यांनी हा प्रयोग करून पाहावा, तेव्हा लक्षात येईल, तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचतील.
सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील, त्यामुळे होणारा त्रास व वाढणारा औषधी खर्चही वाचेल.
चला तर मग आत्तापासूनच ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून बाहेरची थंड Drinks बंद करूया..
हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका.
सुंदर माहिती !