कोरोना च्या काळामध्ये, भारतात सगळ्यात जास्त सर्च झालेला पदार्थ म्हणजे पाणीपुरी आहे .
पाणी पुरी रेसिपी साहित्य
पुरीचे साहित्य-
१.रवा (१ कप )
२.मैदा (३ टेबल स्पून )
३.बेकिंग पावडर म्हणजे सोडा (१/४ चहाचा चमचा )
४.मीठ (१/२ चमचा)
५.तळण्यासाठी तेल
मसाला पाण्याचे साहित्य 💦 –
१.चिंचेचा कोळ (१/२ कप )
२.पाणी (२ कप )
३.भाजलेली जिरे पूड (२ चमचे )
४.न भाजलेले जिरे (२ चमचे )
५.कोथिंबीर चिरलेली 🌿 (१/२ कप)
६.हिरव्या मिरच्या (३)
७.पुदिन्याचे (१ कप )
८. काळे मीठ (१ चमचे )
९. बुंदी (१ टेबल स्पून)
१०. बारीक केलेला गुळ (२ चमचे )
सारणाचे साहित्य-
१. उकडलेले बटाटे (२ मध्यम )
२. पांढरे वाटाणे ( १/२ कप पाण्यात उकडून )
३. हिरवी चटणी
४. चिंचेची चटणी
कृती
पुरी बनवणे-
परातीत रवा ,मैदा,थोडा बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करावे व थोडे कोमट पाणी मिसळत घट्ट पीठ भिजवावे. नेहमीच्या पुऱ्यांप्रमाणे पीठ घट्ट असावे. बनवलेले पीठ ओलसर कापडाने झाकून ३० मिनिटे ठेवावे . ⏳
तयार असणाऱ्या पीठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवावे व पीठ सुकू न देण्याची दक्षता घ्यावी.
या गोळ्यांचे सुक्या मैद्याच्या सहाय्याने मोठी व पातळ अशी पोळी लाटावी. या चापातीतून छोट्या झाकणाच्या मदतीने किंवा धार असणाऱ्या वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्या .
पुऱ्या तळणे (महत्वाचे)-
पुऱ्या तळत असताना तेल कडकडीत तापलेले असावे याची खबरदारी घ्यावी, अन्यथा पुऱ्या तेल पितील ,फुगणारही नाहीत आणि मऊ होतील. तेल बरोबर तापलेले आहे का पाहण्यासाठी एक पुरी तेलात टाकून पहा, ती लगेच वर आली तर समजा तेल पुरेसे तापले आहे. पुरी जर तळाशीच राहिली तर तेल अजून तापू द्यावे.
पण तेल इतकेही तापू देऊ नये कि त्यातून धूर येऊ लागेल 😉. असे झाल्यास पुऱ्या करपट होतील आणि काळ्या पडतील .
पुऱ्या तळताना तेल एखाद्या खोलगट भांड्यात किंवा कढईत घ्यावे व पुऱ्या झऱ्याच्या मदतीनेच तळाव्यात.
तळताना पुरी मधोमध झार्याच्या मदतीने थोडी दाबावी म्हणजे ती चांगली फुलेल, सर्व पुऱ्या अशा छान फुगायला हव्यात. एकदा फुगलेली पुरी पालटावी व चांगली शिजू द्यावी.
पुऱ्या करपू न देता तेलातून बाहेर काढून किचन टॉवेल किंवा टिशू पेपर वर पसराव्या त्यामुळे तेल निथळले व थंड झाल्या कि हवाबंद डब्यात भरून ठेवाव्या.
मसाला पाणी-
पुदिना, कोथिंबीर व हिरव्या मिरच्या यांची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी.
पाण्यासाठीचे बाकी सर्व वर सांगितलेले साहित्य व मिक्सर मधील पेस्ट पाण्यात मिसळावी. गुळ पूर्णपणे विरघळून द्यावा. मसाल्याचा झणझणीतपणा व चिंचेचा आंबट पणा अवडणाऱ्या चवीप्रमाणे कमीजास्त करावा.
हे पाणी गाळून घेऊन फ्रीज मध्ये १ ते २ तास थंड करून घ्यावे त्यानंतर त्याचा उपयोग करावा. पाणीपुरी करायला घेण्यापूर्वी या पाण्यात थोडी बुंदी मिसळावी.
सारण करण्यासाठी-
एका छोट्या भांडयामधे पांढरे वाटाणे, आणि कुस्करलेले बारीक बटाटे आणि मीठ घालून चांगले मिसळावे व बाजूला ठेवावे. वाढताना
एक पुरी घ्यावी आणि तिच्या एका कडक बाजूला बोटाने टोचून भोक करावे त्यात थोडे सारण भरावे त्या सोबत हिरवी चटणी व चिंचेची पाणी ही थोडी थोडी भरावी, त्या नंतर फ्रीजमध्ये थंड केलेल मसाला पाणी घालावे. हे पाणी घालताना आधी चांगले ढवळून घ्यावे .
अशा प्रकारे घरी बनलेल्या चमचमीत पाणी पुरीचा आनंद घ्या. 😋
पाणीपुरी बद्दल इतिहास जाणून घेऊया / पाणी पुरी चा शोध कसा लागला ? 😰
महाभारतामध्ये महाकाव्यात नुकतेच लग्न झालेली द्रौपदी तिची सासू कुंती यांच्याकडे घरी परतण्यापूर्वी आली होती.
पांडवांना हद्दपार केले होते आणि तिची नवीन सून घरात असणाऱ्या गोष्टीत स्वयंपाक सांभाळेल की नाही, याची कुंतीला काळजी होती.
म्हणून तिने द्रौपदीला थोडी राहिलेली बटाट्याची भाजी आणि फक्त एक पुरी तयार करण्यासाठी थोडे गव्हाचे पीठ दिले आणि पाचही मुलांची भूक भागवण्यासाठी जेवण बनवण्याची सूचना केली. असे मानले जाते की तेव्हा नवीन वधूने द्रौपदीने पाणीपुरीचा शोध लावला. असणाऱ्या सुनेच्या हुशारीला प्रभावित होऊन कुंतीने ह्या पाणीपुरीला अमरत्व दिले, जि आत्ता आपण बोटे चाटून मिटक्या मारत खातो.
तुम्हाला जर हे रेसिपी आणि माहिती आवडली असेल तर मित्रान सोबत नक्की शेअर करा. 😎