माहिती

पहिली नवीन कार घेताना कोणत्या गोष्टी पहाव्यात

Things To Know Before Buying A First New Car In Marathi

जर तुम्ही नवीन कार घेण्याच्या विचारात असाल तर फक्त डोळे झाकून जास्त जाहिरात झालेला ब्रँड किंवा डोळ्यांना चांगली दिसणारी गाडी चा ब्रँड चुकून सुद्धा निवडू नका. कार म्हणजे एक प्रकारचे १ रूम चे छोटे घर आहे, जज्यात फक्त टॉयलेट बाथरूम नसते. त्यामुळे नवीन कार घेताना खूप विचार करणे गरजेचे आहे.

घर घेतल्यानंतर अंगणात किंवा पार्किंग मधेय एक तरी चार चाकी असावी हे सगळ्यांचेच स्वप्न असते. कार घेताना खूप महत्वाच्या गोष्टी पाहाव्या लागतात ज्यामधे सुरक्षितता, चालवण्याचा मोड आणि बरेच काही. मी स्वतः ३ वर्षे ऑटोमोबाइल्स मधे काम केल्या मुळे तुम्हाला याबद्दल खूप चांगली माहिती सांगेन त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊ शकता. चला तर मग सुरु करूयात 🙂

कार किती मोठी घेतली पाहिजे ? SUV,Mini SUV, Hatchback का सेडान

हा प्रश्न अगदी साधा सोपा वाटत असला आणि ऑलरेडी तुमचा बजेट फिक्स झाले असले तरी सुद्धा महत्वाचे आहे. तुम्हाला माहीतच आहे डिझेल गाड्या जास्त करून मोठ्या आकाराच्या असतात, आणि महिंद्रा च्या जवळपास सगळ्याच गाड्या डिझेल असतात कारण त्यांच्या इंजिन पावर जास्त असते आणि त्यांना जास्त लोड न्यायची गरज पडते, परंतु दिल्ली मधे वाढत्या प्रदूषणामुळे २००० CC  वरील गाड्यांना पाबंदी आणली आहे. तेव्हा या सर्व SUV गाड्यांवर खूप मोठा परिणाम होतो, वरून पार्किंग स्पेस पण खातात.

गाडी घेणे एकदाच होते म्हणून जर तुम्ही हत्ती सारखी पाळणार असाल तर त्याचा काही उपयोग नाही त्याला खुराक आणि खर्च पण तेवढाच लागणार. जर तुमचे बजेट कमी असेल आणि घरात ४-५ माणसे असतील तर डोळे झाकून Hatchback गाडी चा पर्याय निवड करा. विनाकारण एसयूव्ही च्या मागे हौस म्हणून लागू नका. रोज भरपूर खराब रस्त्यातून वापर होणार असेल तर तुम्ही नक्कीच एसयूव्ही ची निवड करू शकता ज्यामधेय Hyundai Creta, Kia Seltos aani Maruti Brezza ची बजेट नुसार निवड करू शकता

कार चालवण्याचा प्रकार कोणत्या घ्यावा

ऑटोमॅटिक ट्रान्समिशषन का मॅन्युअल ट्रान्समिशषन? सध्या कंफर्ट झोन ला खूप डिमांड असल्यामुळे लोक ऑटोमॅटिक ट्रान्समिशषन च्या गाड्या घेतात ज्यामधेय फक्त ब्रेक आणि रेस हे दोनच प्याडल असतात (ऍक्टिव्ह , स्कुटी सारखी सिस्टिम). जर तुमचा दररोज चा वापर ४०किमी पेक्षा जास्त होणार असेल भले तो शहरातून किंवा हायवे वरून तर तुम्ही नक्कीच ऑटोमॅटिक ट्रान्समिशषन ची गाडी घ्या. नाही तर कार चालवण्याचा आनंद हवा असेल तर मॅन्युअल ट्रान्समिशषन एकदम उत्तम. ऑटोमॅटिक ट्रान्समिशषन हे मॅन्युअल ट्रान्समिशषन पेक्षा भरपूर महाग असते.

फ्रंट व्हील ड्राईव्ह कि ऑल व्हील ड्राईव्ह ? फ्रंट व्हील ड्राईव्ह मधे फक्त पुढच्या चाकांना ताकद दिली जाते आणि ऑल व्हील ड्राईव्ह मधे सर्व चाकांना ताकद दिली जाते. ऑफ रोडींग करणार असाल किंवा खूप खूप खराब चिखलाच्या रस्त्यातून कार चालवणार असाल तरच ४ व्हील ड्राईव्ह कार घ्या नाही तर डिझेल ला पैसे भरून घाईला याल. फोर व्हील / ऑल व्हील ड्राईव्ह हा पर्याय बहुतेक मोठ्या गाड्यांनाच येतो त्यामुळे त्याची किंमत खूप मोजावी लागते.

कार घेताना पाहावयाची सेफ्टी फीचर्स (Navin Car ghetana kay pahawe)

गाडी ची किंमत हि मूळ म्हणजे गाडी च्या बनावटी वर, सेफ्टी फीचर्स वर आणि ब्रँड नेम वर ठरते. मारुती च्या गाड्या स्वस्तात का मिळतात ? कारण मारुती च्या गाड्या थोड्या हलक्या बनावटीच्या असतात. गाडी मधे वापरला जाणारा बाहेर पत्रा हा कमी जाडीचा वापरला जातो. ज्यामुळे गाडी चे वजन कमी होते आणि मायलेज वाढते. परंतु अपघातावेळी या पात्तळ पत्रा आणि हलकी चासी वापरलेल्या गाड्यांमध्ये जीवित हानी होण्याचे प्रमाण खूप असते. त्यामुळे खूप महाग पण नको आणि खूप स्वस्त पण नको तेव्हा तुम्ही टाटा किंवा ह्युंदाई कार चा विचार करू शकता.

सेफ्टी मधे गाडीच्या पत्र्यासोबत अनेक बाबी येतात. जसे कि एअर बॅग, ट्रॅकशन कंट्रोल , एबीएस (ABS), पार्किंग सेन्सर आणि बरेच काही. रोजच्या वापरासाठी गाडी मध्ये कमीत कमी पुढे २ एअर बॅग असाव्यात आणि गाडी मधे ABS (अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम) असावी ज्यामुळे अपघात मधे नुकसान कमी होण्यास मदत होते.

पेट्रोल कार का डिझेल कार (Petrol car ghyawi ka diesel car)

जर तुमचा रोजचा वापर ४०KM  च्या वरती होणार असेल तरच डिझेल कार घ्या. डिझेल कार हे नेहमी पेट्रोल कार पेक्षा महाग असते. तर त्या पैश्यांचे तुम्ही पेट्रोल कार घेऊन पेट्रोल टाकू शकता. नेहमीच्या वापरासाठी डिझेल कार परवडतात नाही तर पेट्रोल कार नेहमीच चांगली. पेट्रोल कार मधे आवाज कमी येतो आणि डिझेल कार मध्ये काही प्रमाणात आवाज येतो आणि व्हायब्रेशन पण येतात. तसेच डिझेल कार चा वापर सतत होत नसेल तर कार चालू करण्यासाठी बराच वेळ लागतो.

डिझेल कार चा पेट्रोल कार पेक्षा मेंटेनन्स खूप जास्त असतो, आणि काही लोकांना डिझेल कार च्या वासाने सुद्धा त्रास होतो.

कार घेताना कोणत्या रंगा ची घ्यावी (Car ghetana konata color ghyawa)

जरी हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न असला तरी त्यामध्ये काही त्रुटी आणि फायदे देखील आहेत. जर तुम्ही कार घेऊन विकणार असाल आणि गाडी चा रंग पांढरा नसेल तर तुम्हाला गाडी ची किंमत कमी मिळेल. पांढरा किंवा जे लाईट कलर असतात ते उन्हात तापत नाहीत. त्याचप्रमाणे पांढऱ्या किंवा सिल्वर कलर वर तुम्हाला लहान लहान खरचटे दिसत नाहीत, आणि डार्क म्हणजे गडद कलर वर तुम्हाला खरचटे उठून दिसतात. गडात रंग उन्हात लवकर तापतात त्यामुळे ऐसी लावून इंधन जास्तं जळते.

रात्री च्या प्रवासामध्ये गडद रंगा वर प्रकाश पडला तरी गाडी नीट दिसून येत नाही. पांढरी कार असेल तर लगेच दिसून येते. गडद रंगाच्या तुलनेत पांढऱ्या रंगाच्या गाड्यांचे अपघाताचे प्रमाण खूप कमी आहे.

कार घेताना काही लक्ष्यात घ्यायच्या मुख्य गोष्टी

  1. एका डीलर कडे जाऊन लगेच कार बुक करू नका, ते तुम्हाला काही पण अमिश दाखवून बुकिंग करण्यास भाग पडतील. प्रत्येक डीलर चे कमिशन काही प्रमाणात वेगळे असते तर काही डीलर इन्शुरन्स, टॅक्स ,आणि सर्व्हिस चार्ज मधून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ३-४ डीलर ला भेट देऊन बुकिंग करा.
  2. जेवढा जास्त ग्राउंड क्लीअरन्स तेवढी तुम्ही गाडी ओबड धोबड रस्त्यात चालवू शकता.
  3. गाडी स्वतः चालवून बघा आणि मगच घ्या, नुसती डोळ्याने पाहून घेऊ नका.
  4. इन्शुअरन्स चा प्रकार आणि बाहेरील व डीलर ची प्राईस तुलना करून निवडा. तसेच इन्शुरन्स क्लेम करते वेळी काही कंपन्या खूप त्रास देतात, तेव्हा चौकशी करूनच इन्शुरन्स घ्या.
  5. जास्त पैसे घालवून टॉप मॉडेल घेण्यापेक्षा साधे किंवा मधले मॉडेल घेऊन त्याला तुम्ही एकसेसिरीस लावू शकता.
  6. गाडीची वॉरंटी किती आहे चेक करा.
  7. जेव्हा शोरूम ला भेट द्याल तेव्हा अनुभवी माणसाकडून प्रत्येक मॉडेल ची माहिती घ्या, नाही तर गाडी घेतल्या नंतर फीचर्स मध्ये तफावत जाणवेल.
  8. सण रूफ चा काही फायदा नाही, तो फक्त एक शौक म्हणून लोकं घेतात.
  9. जेवढ्या जास्त ऐरबॅग तेवढे चांगले.
  10. जेवढी जास्त फीचर्स तेवढा मेंटेनन्स आणि खर्च जास्त.
  11. हल्ली डीलर्स किंवा सेल्स पर्सन डिस्काउंट मध्ये खूप घोटाळा करतात, त्यासाठी पैसे दिले कि लगेच समोर पावती मागा.
  12. फक्त स्वस्त गाडीचा विचार करू नका, त्यामध्ये सुरक्षा फीचर्स चा पण विचार करा. अपघात सांगून होत नाही.
  13. कॅश पेमेंट करणार असाल, तर गाडी वर चांगला डिस्काउंट मिळतो.

अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट मध्ये नक्की विचारा !

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button