आरोग्य

अपचनाची लक्षणे आणि घरगुती उपाय – Apachan lakshane aani Gharguti Upay

Indigestion Symptoms and Home Remedies in Marathi

अपचनाची लक्षणे आणि घरगुती उपाय – सध्या च्या धावपळीच्या जगात लोकांचे बाहेरचे खनीचे प्रमाण खुप वाढलेले आहे. त्यात फ़ास्ट फ़ूड म्हणजे लोकांचा एकदम आवडीचा विषय आणि त्यामुळेच शरीराची पूर्णपणे वाट लागत आहे. लोकांना हे माहित नसते कि प्रत्येकाचे शरीर प्रकृती वेगळी असते उदाहरणार्थ काही जणांना दूध पाचट नाही, काही जणांना आंब्या मुळे रॅशेस होतात. तर अपचन हे त्यातलेच आहे. तेव्हा ज्या गोष्टी पासून तुम्हाला अपचन होत असेल त्या गोष्टी तुम्ही खाण्यापासून नक्की टाळा. अपचन ला English मध्ये Indigestion म्हणतात.

अपचन हे सहसा व्यायाम ना करणाऱ्या बऱ्याच लोकांना होते. हा काही गंभीर आजार नाही आणि तो घराच्या घरी बारा केला जाऊ शकतो. या पोस्ट मध्ये आपण अपचन, जळजळ तत्याची लक्षणे आणि भरपूर घरगुती उपाय पाहूया.

अपचनाची लक्षणे (Apachan Lakshane Marathi)

  • छातीत जळजळ – छातीत वेदनादायक जळजळ होण्याची भावना
  • काही न खाता पोट पूर्ण आणि फुगलेला जाणवते 
  • सतत ढेकर येणे आणि पोटात गॅस होणे
  • तोंडाची चव कडू होणे

Apachan lakshane aani Gharguti Upay

अपचन घरगुती उपाय (Apachan Gharguti Upay in Marathi)

1. करपट ढेकर येत असतील, अजीर्ण झाले असेल, तर अर्धे लिंबू घेऊन त्यावर एक चिमटी सुंठ पावडर टाकून, एक चिमटी सैंधव मीठ टाकावे व हे लिंबू गरम करावे. निखाऱ्यावर खदखदू लागले की, उतरवून थोड्या वेळाने थोडेथोडे चोखत राहावे.

2. जास्त जेवणामुळे अजीर्ण झाल्यास पाव चमचा मिरपूड + एक चमचा आल्याचा रस एकत्र करून घ्यावे.

3. अपचन होऊन करपट ढेकर येत असतील तर, तसेच उलटीही होत असेल; तर आठ-दहा वेलदोडे घेऊन चार वाट्या भरून पाण्यात राकावेत, ते उकळून पाव वाटी करावे व त्यात अर्धा चमचा साखर टाकावी. हा काढा दिवसातून चार वेळा घ्यावा.

4. अजीर्ण झाले असल्यास अगर पोटफुगी झाल्यास अर्धा चमचा साजुक तुपात चार लसणाच्या पाकळ्या ठेचून, तळून लालसर झाल्यावर खाव्यात.

5. अपचन झाले असेल तर अगर तोंड आले असेल तर एक चमचा लोणी घेऊन दोन चिमट्या जिरेपूड व दोन चिमट्या साखर घालून ते मिश्रण सकाळ, दुपार व संध्याकाळी घेतल्यास तक्रार दूर होते.

6. लोणी काढल्यावर जे ताक शिल्लक राहते, त्या ताकाला सैंधव मीठ थोडेसे लावून ते प्याल्यास अजीर्ण पळून जाते.

7. अजीर्णामुळे पोट दुखत असेल तर एक चमचा आल्याचा रस घ्यावा. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा व चिमटीभर मीठ घालून प्यावे.

8. अजीर्ण झाले तर एक चमचा कांद्याचा रस घेऊन, त्यात एक चमचा आल्याचा रस मिसळून घेतल्यास अजीर्ण नाहीसे होते.

9. दोन वाट्या पाणी घेऊन, त्यात एक चमचा धने घालून उकळवून त्याची एक वाटी केल्यास, सकाळी चहाच्याऐवजी हा काढा घेतल्यास अपचनाचे विकार होणार नाहीत. भूक लागेल.

10. अजीर्ण झाल्यास कडुनिंबाची दोन ओंजळी फुले घेऊन, ती फुले एक दोन तांबे भरून पाणी घेऊन त्यात टाकून उकळवावी. उकळवून हे पाणी पाव तांब्याभर करावे, हा निंबार्क दिवसातून तीन वेळा, एका वेळी तीन चमचे याप्रमाणे घ्यावा.

11. वरील विकारावर निंबाऐवजी कडुनिंबाची पाने (ओंजळभर) आणून ती वाळवावीत, त्याचे चूर्ण करावे व अर्धा चमचा चूर्ण सकाळी उठल्यावर अनुशापोटी घेऊन त्यावर गरम पाणी एक कप प्यावे

12. पाव चमचा सुंठ पावडर घेऊन, त्यात पाव चमचा साखर घालून, ते मिश्रण रोज सकाळी अनोशापोटी घेतल्यास भूकही चांगली लागेल.

13. एक ग्लासभर ताकात अर्धा चमचा उगाळलेली सुंठ घालून थोडेसे सैंधव मीठ टाकून ते प्यावे.

14. अजीर्णामुळे वारंवार पोटात दुखून शौचाला व्हायला लागले तर सुंठ पाण्यात उगाळून अर्धा चमचा घ्यावी. पाव चमचा साजुक तूप घालावे. पाव चमचा जुना गूळ किंवा साखर घालून हे मिश्रण चांगले शिजवून तयार झाले की चाटावे.

15. अपचन होऊन आंबट ढेकर येत असतील तर मूठभर मनुका व तेवढीच बडीशेप एक ग्लासभर पाण्यात उकळवून अर्धा ग्लास पाणी झाल्यावर ते पाणी गाळून दिवसातून एकदा घ्यावे.

16. रात्री मूठभर मनुका व मूठभर बडीशेप भिजत घालावी. सकाळी मनुका त्यात कुस्करून ते पाणी गाळून खडीसाखर त्यात घालून घ्यावे.

17. अन्न पचत नसेल तर तीन वाट्या पाण्यात सुपारीएवढी जुनी चिंच भिजत घालावी. त्यात ती चांगली कुस्करून हे पाणी गाळून
घ्यावे. त्यात थोडेसे सैंधव + चिमूटभर जिरेपूड व तीन चमचे साखर घालून हिंग सई जिरे तुपाची फोडणी द्यावी. भातावर हे सार घ्यावे.

18. अजीर्ण झाल्यास आले व लिंबाचा रस एक एक चमचा समप्रमाणात घेऊन त्यात थोडे सैंधव टाकून दिवसातून चार वेळा घ्यावे.

अजून वाचा

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button