ओवा खाण्याचे फायदे – घरगुती औषधांमध्ये पोटाच्या विकारांवर उपयुक्त असणारे व सहज उपलब्ध असणारे द्रव्य महणजे ओवा. घरगुती औषध म्हणून ओव्याचा उपयोग फार प्राचीन काळापासून भारतात होतो. साधारणतः एक फूट वाढणारे, सुगंधित व लवयुक्त असे याचे रोप असते. फुले लहान, वांगी रंगाची असतात.
ओवा लघू, रुक्ष, तीक्ष्ण, तिखट-कडू चवीचा असून उष्ण असल्याने कफवातनाशक आहे. वेदनाशामक असून विविध लेपांमध्ये याचा उपयोग करतात. तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, अजीर्ण, मलावरोध, यकृताचे विकार, पोटदुखी, वारंवार होणारे जुलाब, कृमी, जंत या विकारांत ओवा उपयुक्त ठरतो.
कॉलरासारख्या विकारात उत्पन्न होणाऱ्या अतिसार (जुलाब) या लक्षणात ओवा हे सर्वोत्तम औषध म्हणून सिद्ध झालेले आहे. यामध्ये प्रथम एक तोळा रस रुग्णाला द्यावा व नंतर दोन तासाला दोन-दोन चमचे देत रहावा. याने जुलाबाचा तांदळाच्या धुवणासारखा रंग बदलून तो पिवळा होतो व मळही घट्ट होऊ लागतो.
ओवा खाण्याचे फायदे (Owa khanyache Fayde Marathi)
बाळंतिणीला ओवा खायला दिल्याने तिची पचनक्रिया सुधारते, ताप येत असल्यास तो बरा होतो व अंगावर दूध चांगले येते.
मूतखडा होणे वा लघवी अडखळत असल्यास ओव्याचा उपयोग होतो. सर्दी, खोकला, उचकी लागणे, दम लागणे या विकारांत ओवा उपयुक्त आहे. लहान बालकांत कफ जास्त झाल्यास छातीला ओव्याच्या पुरचुंडीने शेकायचा प्रघात आहे.
वायू संचित होऊन पोट फुगल्यास पोटावर ओवा वाटून लावल्यास गॅसेस कमी होऊन पोटदुखी थांबते.
दम लागल्यास ओव्याचा ओढल्यास श्वास कमी होतो. धूर नाकाने
खराब झालेली जखम असल्यास ती भरून येण्यासाठी ओव्याचा उत्तम उपयोग होतो.
ओव्याचे तेल संधीवातामध्ये सांध्यांवर चोळतात. त्यामुळे सांधेदुखी कमी होते.
स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी अंगावर साफ जात नसल्यास ओवा खायला दिल्याने स्राव सुधारतो व पोटदुखी, कंबरदुखी असल्यास कमी होते.
ओवा व तीळ एकत्र घेतल्यास वारंवार होणारी मूत्रप्रवृत्ती कमी होते.
अजून वाचा –