आरोग्य

मांस (चिकन मटन) आणि अंडी खावीत की नाही – Maansahar Fayde Nuksan

Whether to Eat Meat (Chicken, Mutton) and Eggs or Not In Marathi

इतर अनेक समाजातील लोकांपेक्षा भारतीय लोक प्रामुख्याने शाकाहारी असल्याने मांसाहार कमी प्रमाणात करतात. बकरी, कोंबडी, मासे यांतून चांगल्यापैकी प्रथिने मिळतात हे खरे आहे, परंतु फक्त मांसाहारातूनचप्र थिने मिळतात हा मात्र गैरसमज आहे. उलट प्राणिज प्रथिने पचवण्यासाठी विशेष पचनक्षमता लागते, तशी वनस्पतिजन्य प्रथिने पचवण्यासाठी लागत नाही.

आपल्यासाठी मांस अत्यंत पित्तकारक असते. उष्णता निर्माण करते. पचनक्षमता उत्तम असल्याखेरीज मांस पचू शकत नाही. परंतु आपली सध्याची जीवनशैली, चुकीचा आहार, शारीरिक कष्टांचा अभाव या सर्व गोष्टींचा आपल्या पचनशक्तीवर विपरीत परिणाम झाला आहे.

निसर्गत: मानव शाकाहारी आहे. यासाठी शरीरविज्ञानातील काही बाबी आधारभूत आहेत

  • मांस फाडण्यासाठी लागणारे तीक्ष्ण सुळे आणि मोठा जबडा माणसाला नाही.
  • प्राणिज अन्न लवकर कुजते, त्यामुळे मांसाहारी प्राण्यांची आतडी लहान असतात तर माणसाचे आतडे शाकाहारी अन्न पचवण्यायोग्य असे लांब असते. त्यात अन्न बराच काळ राहून त्याचे सावकाश पचन होण्याची व्यवस्था असते.
  • मांसाहारी प्राण्यांच्या व शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यातील पचनासाठी लागणारे जिवाणू वेगळ्या जातीचे असतात.
  • मांसाहारी प्राण्यांच्या जठरात माणसाच्या जठरापेक्षा, मांस पचवण्यासाठी लागणारे आम्ल जास्त असते. आपल्या शरीराच्या नैसर्गिक घडणीच्या विरोधात काहीही केले तर त्याने माणसाचे भले होणार नाही.

मांसाचे दुष्परिणाम (Disadvantages of Meat in Marathi)

प्राण्यात असलेले सर्व दोष, उणिवा त्याचे मांस खाणाऱ्याच्या शरीरातही प्रवेश करतात. पाळीव प्राणी पूर्णत: सशक्त असणे हे जवळजवळ अशक्यच असते. माणसाप्रमाणे त्यांनाही अनेक रोग असतातच. हे रोग मांसाहारी माणसाच्या शरीरात प्रवेशणार की नाही, हे केवळ एखाद्याच्या नशिबावरच सोडावे लागते.

  • संप्रेरकांचा वापर : कृत्रिम वाढीसाठी कृत्रिम संप्रेरके प्राण्यांना दिली जातात. त्यामुळे त्यांच्या स्नायूंमधील चरबीचे प्रमाण वाढते, ते खाणाऱ्याकडे अर्थातच जाते. लवकर वयात येणे, मासिक पाळी लवकर येणे, पौगंडावस्थेच्या खुणा लवकर व जास्त प्रमाणात दिसू लागणे (स्तनांची वाढ, मुलांमधील आवाजाचा घोगरेपणा, छातीवरील केस), अतिरेकी वजनवाढ, मुरुमे वाढणे, मंदावलेली रोगप्रतिकारक शक्ती, पुनरुत्पादन क्षमतेतील उणिवा असे अनेक परिणाम दिसून येतात.
  • कोलेस्टेरॉल व साठलेली चरबी : प्राणिज अन्नात हे भरपूर असते. त्यामुळे धमन्या कठीण होणे व रक्तदाब वाढणे, हृदयरोग, पक्षाघात असे अनेक धोके संभवतात. चरबीमध्ये विषारी द्रव्ये साठवली जातात, त्यामुळे चरबी साठणे हाच एक मोठा धोका आहे.
  • युरिक आम्ल : मांसातील प्रथिनांमध्ये युरिक आम्लाचे प्रमाण बरेच असते. त्यामुळे संधिवात, हाडांची झीज, मुतखडा, मूत्रपिंडाचे विकार असे आजार जडू शकतात.
  • तंतुमय पदार्थांचा अभाव : मांसात तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असल्याने मलावरोध आणि इतर अनेक आतड्याचे विकार जडू शकतात.
  • आम्लता : मांसात आम्लता जास्त प्रमाणात असल्याने पेशींमधील आम्लता वाढून, रोगांना निमंत्रित करते.
  • भयग्रस्तता : प्राण्याला मारतात तेव्हा मरण्याच्या भीतीच्या प्रतिसादापोटी अनेक रसायने आणि संप्रेरके सोडली जातात. ती सर्व मांसाहारीच्याही शरीरात जाऊन त्याचे अनेक अदृश्य परिणाम होतात.
  • जाड्य अथवा मांद्य : उष्ण कटिबंधातील माणसांनी मांस खाण्याने शरीर व मनही जड आणि कमजोर होते. त्यामुळे प्राचीन लिखाणात मांसाहार तामसी वर्णिला आहे.
  • मांसाहार आणि कर्करोग : स्तन, प्रोस्टेट ग्रंथी, बीजाशय, गर्भाशय, आतडे आणि स्वादुपिंड यासारख्या विविध प्रथिनांशी काही विशिष्ट संबंध असल्याचे लक्षात आले आहे.

मांसाहारामध्ये कुठलीही पोषकद्रव्ये असली तरी त्यासाठी इतका धोका स्वीकारता येणार नाही. विकरे, ऊर्जा, आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असा शाकाहार मांसाहारापेक्षा नक्कीच श्रेष्ठ दर्जाचा आहे. डाळी, कडधान्ये, सुका मेवा, तृणधान्ये, भाज्या आणि दूध यांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला शाकाहार निश्चितच आपल्याशरीराची अमिनो आम्ले आणि प्रथिनांची गरज भागवू शकतो.

पूर्णपणे शाकाहारी होण्याआधी एखादी मांसाहारी / मिश्राहारी व्यक्ती पुढील काही सूचनांचे पालन करू शकते.

आरोग्यदायी मांसाहार – Healthy Meat

  • भाज्या व मोडाच्या धान्यांबरोबर मांस खाणे : भाज्यांमधील व मोडाच्या धान्यांमधील जीवनसत्त्वे आणि विकरे मांस पचायला मदत करतात, ते पचनासाठी हलके होते. या मिश्रणाचे सॅलड करूनच खावे.
  • शिजवण्याआधी व्हिनेगर, दही अथवा लिंबाचा रस मांसाला चोळून ठेवावा. त्याने मांस पचायला हलके होते व त्यातील पौष्टिकताही टिकते.
  • मेंदू, यकृत असे अवयव खाणे टाळावे; कारण त्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. अंड्यातीलपिवळ्या बलकाच्या 10-12 पट जास्त कोलेस्टेरॉल बकरीच्या मेंदूत असते (पिवळा बलक : 220 मिलिग्राम / एक अंडे).
  • मांसापेक्षा मासा खाणे चांगले : खोल पाण्यातील सामन, सारडाइन, ट्यूना हे मासे पोषणमूल्यांच्या निकषांनुसार उत्तम असतात. हिल्सा, काटला, सुरमई, काळा पापलेट हे आपल्याकडील मासे उत्तम असतात. माशांमधील तेल, मेदाम्ले, ओमेगा-3, 6, ‘अ’, ‘ड’, बी12 इत्यादी जीवनसत्त्वयुक्त असते. त्यात कॅल्शिअमही असते. माशांमधील मेदाम्ले हा सर्वात प्रभावी व नैसर्गिक असा रक्त पातळ ठेवणारा पदार्थ आहे. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध होतो, रक्तातील फॅटी Acids कमी होऊन रक्तप्रवाह खेळता राहून, हृदयरोगाचे प्रमाण कमी होते. नद्यांच्या प्रदूषणामुळे ताजे मासे वापरणे उत्तम. तळण्यापेक्षा भाजून खाणे हितकर असते. मासे रक्तातील युरिक एसिड  वाढवतात, आणि त्यात तंतुमय पदार्थही नसतात. असे असले तरी मांस खाण्यापेक्षा मासे खाणे केव्हाही हितकारक असते.
  • मांस, अंडी अशी जास्त प्रथिने असलेले पदार्थ हे पिष्टमय पदार्थांबरोबर खाऊ नयेत : पचनसंस्था कमजोर असेल तर भात, बटाटे यांबरोबर मांस खाऊ नये. मांस पचवण्यासाठी आम्लता जास्त लागते, लाळेतील अल्कली विकरे पिष्टमय पदार्थ पचवण्याच्या कामात लागतात. प्रथिनांचे पचन त्यामुळे कमी होते. पोटातील जिवाणू मग प्रथिनांवर हल्ला करतात,त्यांचे विषारी पदार्थांत व कुजट वायूत रूपांतर होते.
  • देशी कोंबडी खावी : कृत्रिम वाढ केलेल्या केलेली कोंबडी पिंजऱ्यात बंदिस्त, संप्रेरकांचा, प्रतिजैविकांचा, कीटकनाशकांचा वापर केलेली; त्यामुळे दूषित असते. देशी कोंबडी नैसर्गिक वातावरणात वाढलेली, रानटी भाजीपाला, किडे वगैरे खाणारी, हिंडती-फिरती असते.

अंडी माहिती – Egg Information Marathi

अंड्यामध्ये पोषणमूल्य भरपूर असते.

  • प्रथिने : अंड्यातील प्रथिने ही गुणवत्तेच्या निकषांनुसार उत्तम असतात. इतर प्रथिनांचे जीवशास्त्रीय पोषणमूल्य ठरवण्यासाठी हे प्रथिन परिमाण मानले जाते. (Amino Acid प्रमाण पाहताना असे परिमाण असणे ही महत्त्वाची बाब ठरते.)

अंडी, माणसाचे व गायीचे दूध व मांसातील प्रथिने, यांचे जीवशास्त्रीय मूल्य उच्च असते.

  • जीवनसत्त्वे व क्षार : ‘A’, ‘B’, ‘D’, ‘E’, B12 ही जीवनसत्त्वे, त्यातील बी१२ हे मज्जासंस्थेच्या पोषणासाठी व लाल रक्तपेशींसाठी महत्त्वाचे असते.
  • स्निग्ध पदार्थ : एका अंड्यात 220 ग्रॅम कोलेस्टेरॉल असते. संपृक्त स्निग्ध पदार्थही असतात. लिनोलिक ॲसिड (Omega-6 FF) आणि लेसिथिनसारखी पेशींसाठी आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक अशी काही द्रव्येही असतात. स्निग्ध पदार्थांना लेसिथिन पूरक असते.

रोजच्या आहारातील प्रमाण

फलित अंडी आताच्या दिवसांत मिळत नाहीतच. कृत्रिम प्रकाशात, संप्रेरके आणि प्रतिजैविके देऊन वाढवलेली, फलित नसलेली अंडीच आपल्याला मिळतात, त्यामुळे त्यांचा अतिरेकी वापर टाळणेच इष्ट. फार खाल्ल्याने संप्रेरके व अतिरेकी प्रथिने कुजून ते आरोग्याला धोकादायकच ठरतात.

  • अकाली पौगंडावस्था, तरुण वयात लठ्ठपणा, मुरुमे
  • मध्यमवयीन व वयस्कर लोकांसाठी अंडी चांगली नाहीत. वाढलेले कोलेस्टेरॉल धोकादायक असतेच, हृदयरोग असलेल्यांमध्ये तर संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता वाढते.
  • तंतुमय पदार्थ नसल्याने हृदयरोगी, लठ्ठ व्यक्ती, मधुमेही यांच्यासाठी ते धोकादायक आहे.
  • अंडी प्रतिजैविकेही निर्माण करतात. एविडिन नावाच्या प्रथिनामुळे त्वचारोग, स्नायुदुखी या स्वरूपांची Allergy उद्भवू शकते.
  • अर्धी अथवा पूर्ण कच्ची अंडी खाण्याने साल्मोनेला प्रकारचे पोटाचे संसर्गविकार होऊ शकतात.

एलर्जी अथवा लठ्ठपणा नसेल तर आठवड्याला एक, दोन अंडी तरुण माणसासाठी पुरेशी होतात. वयस्क माणसांनी मांसाहार कमीच घ्यावा. ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, फायटो न्युट्रिएडंट्सची कमतरता शाकाहारही भरून काढतो.

Maans meaning in english is Meat (मांस = Meat)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button