आरोग्य

जुलाब, अतिसार होणे घरगुती उपाय – Julab Gharguti Upay

Diarrhea (Julab) Home Remedies and Treatment in Marathi

जुलाब होणे-आमांश, अतिसार – जुलाब काही दिवसांत उपचार न करता दूर झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला बरे वाटत नाही तोपर्यंत, विश्रांती घ्या, खुप पाणी प्या आणि आपण काय खात आहात त्यावर लक्ष ठेवा. तुम्ही जर वारंवार जुलाब(संडास) साठी बाथरूम मध्ये जात असाल तर तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी खूप कमी होते (Dehydration) आणि त्यासाठी तुम्हाला खूप पाणी प्यावे लागेल.

जुलाब झाल्यावर काय खाऊ नये ? जुलाब झाल्यावर तळलेले पदार्थ, कच्या फळं आणि भाज्या, मसालेदार पदार्थ, कोफी आणि सोडा, सोयाबीन आणि कोबी खूप नका. जुलाब काही तासांपासून दिवसांपर्यंत टिकतात, जास्त त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. Julab(जुलाब) meaning in English is Diarrhea.

जुलाब होण्याची करणे (Julab Honyachi Karane Marathi)

तसे पाहायला गेला तर जुलाब होण्याची खूप करणे आहेत. पोटात जाणारा पदार्थ किंवा पोटात रासायनिक प्रक्रिये द्वारे सुद्धा जुलाब होतात. काही मूळ करणे खालील प्रमाणे.

  • अन्नाची ऍलर्जी – जसे कि काहींना दूध पिल्यावर त्रास होतो
  • गोळ्यांचा परिणाम
  • व्हायरल इन्फेक्शन
  • आतड्यांसंबंधी रोग
  • जिवाणू संसर्ग
  • खूप तेल असलेले आणि मसालेदार बाहेरील चरबट अन्न
  • अतिरिक्त दारू किंवा व्यसन

julab var gharguti upchar marathi

जुलाब थांबवण्यासाठी घरगुती उपाय (Julab var Upay in Marathi)

1. पुष्कळ वेळा अपचन होऊन जुलाब होतात. अशा वेळी लोखंडाची पळी तापवून त्यात एक चमचा साजूक तूप टाकून ते तापल्यावर त्यात चार काळे मिरे टाकून ते फुलल्यावर त्यात थोडा गुळाचा खडा टाकणे. गूळ लालसर काळपट झाल्यावर हे मिश्रण कोमट असताना चाटावे. अडीच ते तीन तासांनी फरक न झाल्यास परत असेच चाटण करून चाटावे.

2. जुलाब होत असल्यास दुसरा एक साधा उपाय करता येण्यासारखा आहे. दोन वाट्या पिण्याचे पाणी घेऊन त्यात एक चमचा बडीशेप घालून, अर्धा चमचा ओवा टाकून खडीसाखरेचे दोन लहान खडे टाकून पाणी उकळवावे. एक वाटी काढा तयार करून तो आटवून गाळून घेणे.

3. काळा चहा (दुधाशिवाय) किंवा कॉफीमध्ये थोडीशी एक चिमटी साखर घालून पाव लिंबू त्यात पिळावे व ते प्यावे.

4. ताजे डाळिंबाचे दाणे कुटून दही किंवा ताक याबरोबर दिवसातून दोन वेळा खाल्ल्यास जुलाब थांबतात.

5. एक पेला ताजे ताक घेऊन त्यात पाव चमचा हिंग व चिमटीभर मीठ घालून प्यावे.

6. जास्त पिकलेली दोन केळी खावीत.

7. लहान मुलांना जुलाबावर ओव्याचा काढा पाजल्यास जुलाब थांबतात. एक वाटी पाणी घेऊन त्यात एक चमचा ओवा घालून ते पाणी आटवून त्यात थोडी साखर घालून (पाव चमचा) पाजावे.

8. जुलाबाबरोबर उलट्यासुद्धा चालू असल्यास एक लिंबाचा रस काढावा. त्यात अर्धा चमचा जियाची पावडर व चिमटीभर मीठ टाकून ते मिश्रण दिवसातून तीन वेळा द्यावे.

9. दोन वाट्या पाणी घेऊन त्यात एक चमचा भरून धने व सुंठ घालून उकळवून त्याचा एक वाटी काढा करावा. जर शौचास पातळ होत असेल तर काढा घ्यावा. आराम मिळतो.

10. शौचास वारंवार होत असेल तर एक ग्लास ताक घ्यावे.

11. हवा पावसाळी असली की, पुष्कळांचे पोट बिघडून तांबडी आव पडते. अशा वेळी चार मोठे कांदे विस्तवावर चांगले भाजावेत, त्यांचा रस काढावा. या रसात निम्मे साजूक तूप घालावे. रस एक वाटी झाल्यास अर्धी वाटी साजूक तूप घालावे. सकाळ, दुपार व संध्याकाळ असे तीन वेळा प्रत्येक वेळी दोन चमचे याप्रमाणे घ्यावे.

12. कोथिंबिरीच्या पंधरा-वीस काड्या घेऊन बारीक चिराव्यात. हे गरम करून मूळव्याध शेकावा. आराम वाटतो.

13. शौचास वारंवार होऊन आव पडते. अशा वेळी खैराच्या काताची एक दोन चिमट्या पूड + एक चमचा मध घालून हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे.

14. उलट्या व शौचास दोन्ही एकदम वारंवार होत असल्यास चुन्याची निवळी एक वाटी घेऊन एक वाटी दूध घ्यावे. हे मिश्रण दर दोन तासांनी प्रत्येक वेळी चार चमचे असे घ्यावे. हे एकच दिवस घ्यावे.

15. सुंठ पावडर पाव चमचा + बडीशेप पाव चमचा (पावडर) + खसखस पावडर पाव चमचा हे सर्व साजूक तुपात भाजून पाव चमचा साखर घालून घ्यावे.

16. आमांशामुळे पोट दुखत असेल तेव्हा एक चिमटी लाल तिखट (मिरची पावडर) घ्यावी. त्यात एक चमचा साजूक तूप, दुप्पट गूळ
घालून मिसळून त्याची गोळी करून खावी.

17. जुलाब अगर पाण्यासारखे रेच होऊ लागले, तर एक जायफळ किसून तव्यावर भाजणे. तेवढाच गूळ त्यात घालून दिवसातून तीन वेळा हे चाटण खाऊन संपवणे. आव झाली असेल, तर साजूक तुपात जायफळ उगाळावे. अर्धा चमचा उगाळलेले हे चाटण अर्धा चमचा मध घालून घ्यावे.

18. बेलफळाचा गर चार चमचे + साखर चार चमचे, एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्यावे.

19. कोवळ्या बेळफळातील गर काढून तो वाफवून घ्यावा. गराच्या चौपट साखर घेऊन त्याचा पक्का पाक करून त्यात वाफवलेला गर टाकून त्यात जायफळ, केशर घालून मुरांबा करावा. हा मुरांबा दिवसातून दोन वेळा अर्धा चमचा याप्रमाणे घ्यावा.

20. रक्ती आव पडत असेल, तर अर्धवट पिकलेल्या बेलफळाचा गर तीन चमचे + दोन चमचे मध + एक चमचा साखर घालून हे मिश्रण दरवेळी परसाकडे जाऊन आल्यावर घेणे.

21. आमांश जास्त प्रमाणात झाला, तर बेलफळाचा गर पाव चमचे+खडीसाखरेची पावडर दहा चमचे एकत्र करून बाटलीत भरून ठेवावे. हे चूर्ण एक चमचा, याप्रमाणे दिवसातून पाच वळा घ्यावे.

22. आमांश झाल्यास सरकी भाजून त्याची राख करावी. एक चमचा सरकीची राख + एक चमचा मध + अर्धा चमचा सुंठ पावडर घालून हे चाटण घ्यावे. असे दिवसातून दोन वेळा घ्यावे.

23. पोट दुखून तांबडी आव पडत असल्यास आम्रवृक्षाच्या आंतरसालीचा काढा करावा. एक हाताएवढी साल ठेचून घेऊन ती चार वाट्या पाण्यात घालून उकळवून हा काढा एक वाटी करावा. अर्धा चमचा मध त्यात टाकून हा काढा दिवसातून दोन वेळा घ्यावा.

24. अतिसार झाल्यास एक चमचा जांभळीच्या पानांचा रस काढून तो एक चमचा मधातून घ्यावा.

25. तांबडी आव पडत असेल, तर जांभळीच्या सालीचा काढा करावा. साल दोन वाट्या पाण्यात घालून ते एक वाटी आटवावे. त्यात अर्धा चमचा मध + एक चमचा साजूक तूप व मोठी खडीसाखर घालून हा काढा दिवसातून दोनदा घ्यावा.

26. कॉलयातील अतिसारावर एक चमचा तुरटी पावडर + थोडासा कात + दालचिनी चूर्ण पाव चमचा हे मिश्रण एक चमचा मधातून
सकाळ-संध्याकाळ घ्यावे.

27. रक्ती आव पडत असेल तर कुड्याची साल+बेलफळातील वाळलेला गर यांचे चूर्ण करून ते एक ग्लास ताकाबरोबर दोन चमचे
चूर्ण, दिवसातून तीन वेळा घ्यावे.

28. बेलफळातील वाळलेला गर + नागरमोथा + सुंठ यांचा काढा अर्धा कप, दिवसातून दोन वेळा घ्यावा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button