जास्वंद फुलांची माहिती मराठी – जास्वंद चे फुल त्याच्या सुंदर दिसणाऱ्या मोठ्या पाकळ्यांमुळे आकर्षित करते. साधारणपणे जास्वंदीच्या 100 हुन अधिक जाती ज्ञात आहे. आपल्याला एकेरी, डबल लाल जास्वंद व सफेद जास्वंद ओळखीच्या आहेत. यातील सफेद जास्वंद दुर्मीळ असली तरी जास्त औषधी आहे. औषधांत कळे, फुले व झाडाचे सालींचा उपयोग करतात. बाजारांत औषधांत वापरण्यासाठी जास्वंदीचे मूळ पिंपळवाळ, अळथी या नावाने मिळते.
English name of Jaswand flower is Hibiscus. जास्वदींचा चहा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन C असते आणि हा जास्वंद च्या सुखावल्या पानापासून बनविला जातो. आफ्रिका मध्ये कॅन्सर आणि आतड्याच्या आजारांवर वापर केला जातो आणि इराण मध्ये उच्च रक्तदाब साठी. अनेक औषधांमध्ये जास्वंद फुलांचा वापर केला जातो. काही घरगुती फायदे काही प्रमाणे.
जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेला रंग खाद्य पदार्थांमध्ये वापरतात.
जास्वंद चहा मधील पोषण गुणधर्म (Jaswand Nutrition Values)
प्रत्येकी 100 ग्रॅम जास्वंद चहा मधील पोषण मूल्य.
- कॅलरी – 37
- टोटल फॅट – 0.7 ग्रॅम
- कोलेस्ट्रॉल – 0 मिलिग्रॅम
- प्रोटीन – 0.4 ग्रॅम
- सोडियम – 3 मिलिग्रॅम
- कार्बोहायड्रेट – 7 ग्रॅम
- पोटॅशियम – 9 मिलिग्रॅम
- साखर – 6 ग्रॅम
जास्वंद फुलांची माहिती आणि औषधी फायदे (Jaswand Flower Information in Marathi)
- पोटातील वायगोळा – जास्वंदिच्या पानांचा १०० ते १२५ मिली रस पोटांत देतात.
- पित्तशमनार्थ – सफेद जास्वंदिच्या पानांचा रस साखर घालून घ्यावा.
- पित्ताच्या गांधी अंगावर उठत असल्यास – कळ्यांचा अंगरस काढूनअंगास (शरीरास) चोळावा.
- केस्तूरडे – अनेक लोकांना केस्तूरड्याचा त्रास होतो. (याचे मुख्य कारण हलगर्जीपणा असू शकते.) केस्तूरडे न होण्यासाठी सफेद जास्वंदिच्या रोज ५ कळ्या १४ दिवस घ्याव्यात.
- गर्भधारण होण्यासाठी – पांढ-या जास्वंदिचे मूळ एकाच रंगाच्या गाईच्या दूधांत उगाळून त्यात महालूंगाच्या बिया वाटून घालाव्यात व ऋतूकाली ते दूध पिण्यास द्यावे.
- गर्भस्त्रावाची खोड – सफेद जास्वंदिचे ५ कळे गाईच्या तूपांत खरपूस तळून २ रा महिना लागल्यापासून रोज सकाळी २ महिने खाण्यास देतात. पांढ-या जास्वंदिचे मूळ व कुंभारीण माशीच्या घराची माती, कुंभाराच्या कुव्यातील चाकाची माती व गोपीचंदन गाईच्या दूधात उगाळून देतात.
- धुपणी – सफेच जास्वंदिच्या ४/५ कळ्या गाईच्या तूपात तळून खडिसाखरे बरोबर खाव्यात, वर गाईचे दूध प्यावे असे दिवसातून 2
वेळा ७ दिवस पर्यंत करावे. – जास्वंदिची फुले वाळवून त्याचे चूर्ण करून देतात. – सफेद जास्वंदिच्या ४/५ कळ्या गाईच्या तूपात तळून खडिसाखर व नागकेशराबरोबर दिवसातून २ वेळा ७ दिवस खाव्यात. - प्रदर,धातू विकार-पांढ-या जास्वंदिच्या मुळ्या, कमलकद, पाढ-या सावरीचा कंद किंवा साल हे सर्व समभाग घेऊन त्यांचे चूर्ण करून त्यांतील ६मासे चूर्ण सकाळ संध्याकाळ खडिसाखर घातलेल्या गाईच्या दुधातून 7 दिवस घ्यावे.
- प्रदर, धातूविकार, रक्तीमूळव्याध, प्रमेह – जास्वदिचे मूळ गाईच्या १२५ मिली. निरश्या दूधांतून एक ते दिड चमचा गरम पदार्थ उगाळून दिवसातूंन २ वेळा असे ७ दिवस घ्यावे. पथ्य -तेलकट, आंबट, तिखट व गरम पदार्थ वर्ण्य.
- प्रदर, परमा – जास्वंदिचे कळे वाटून त्याचा अर्धा काढा करावा. त्यातील अर्धा काढा सकाळी काहिही न खातापिता घ्यावा व शिल्लक काढ्याने गुप्तांग धुवावे.
- धातू विकार – सफेद जास्वंदिच्या ४/५ कळ्या गाईच्या तूपात तळून खडीसाखरे बरोबर खाऊन वर गाईचे दूध घ्यावे.
- मुळव्याध – पांढ-या जास्वंदिचे मुळ निरश्या दुधात उगाळून त्या लेपात खडिसाखर घालून घ्यावे. सफेद जास्वंदिच्या ४/५ कळ्या गाईच्या दुधात तळून खाव्यात.
- जननेंद्रियाची जळजळ – पांढ-या जास्वंदिची मूळी व गोमेटीची मूळी गाईचे तूपांत समभाग उगाळून घ्यावी.
- अतिसार – जास्वंदिची फुले बारीक कुस्करून त्यांत नागकेशर व खडीसाखर घालून घ्यावी.
- केस रंगवण्यासाठी – ३० ते ४० फुलांच्या अंगरसात २ चमचे मेंदिपावडर घालून ते अर्धा किलो खोबरेल तेलांत सिध्द करून गाळून
केसांना लावण्यासाठी वापरावे. - डोक्याला थंडाव्यासाठी तेल – सफेद जास्वंदिच्या फुलांचा १ लिटर अंगरस व खोबरेल तेल १ लिटर एकत्र उकळवून तेल सिध्द करून त्यांत वाळा, जटामासी व नागरमोथा यांची पावडर घालून तेल गाळून डोक्याला लावण्यास वापरावेत.
- टक्कल, चाई, केसांची वाढ – सफेद जास्वंदिच्या पानांचा, फुलांचा अंगरस काढून चोळावा.
- जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेला रंग खाद्य पदार्थांमध्ये वापरतात.
अजून वाचा –
छान पोस्ट आहे. जास्वंद चे एवढे फायदे असतील माहीत न्हवत !