आरोग्य

कोरडा खोकला, कफ साठी घरगुती उपाय (Khokla Ayurvedic Gharguti Upay)

Cough (Khokla) Ayurvedic Home Remedies in Marathi

कोरडा खोकला घरगुती आयुर्वेदिक उपाय – काही वेळेस कोरडा खोकला होतो. कफ झालेला नसतो; परंतु त्याची ती पूर्वसूचना असते. घसा खवखवतो. अशा वेळी अगदी साधा उपाय करता येईल. उन्हातून आल्यावर कधीही अचानक थंड पाणी पिऊ नका. काही लोकांना खोकला सुरु झालं कि थांबत नाही त्या लोकांनी छाती चा X-Ray काढून डॉक्टर्स चा सल्ला घ्यावा(दमा किंवा टिबी चा त्रास असू शकतो). खोकला हा आजार घरगुती आयुर्वेदिक उपचारांनी नक्कीच बरा होतो. नियमित सूर्यनमस्कार आणि व्यायाम केल्याने शरीरातील घाम निघून खोकला आणि कफ होण्याचे प्रमाण खूप कमी होत. Khokla Meaning in English is Cough.

खोकला लहान मुलांना असो किंवा जास्त वय असणाऱ्या माणसांना , खालील दिलेल्या उपाया किंवा औषधाने तो नक्कीच बारा होऊ शकतो.

कोरडा खोकला, कफ घरगुती उपाय (Khokla Ayurvedic Gharguti Upchar Marathi)

1. एक ग्लास गरम पाणी घेणे. हे पाणी घशाला जेवढे सोसवेल तेवढे गरम घेणे. एक चिमटीभर बारीक मीठ त्यात टाकणे. एक चमचा मध टाकणे व अर्धे लिंबू पिळणे. चमच्याने हे मिश्रण चांगले ढवळावे व ह्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. सकाळी उठल्यावर, तोंड धुतल्यावर प्रथम या ग्लासभर पाण्याच्या गुळण्या कराव्यात. अनेशापोटी गुळण्या केल्यावर एक तासाने चहाकॉफीसारखे पेय घेतल्यास चालते. असे दिवसातून तीनदा(गुळण्या) करावे. सकाळ, दुपार व रात्री झोपण्यापूर्वी करावे. हे तीन दिवस केल्यास खोकला जातो. खवखव कमी होते. ह्या पाण्याच्या गुळण्या करताना थोडे थोडे पाणी गिळले गेले तरी अपाय होत नाही. उलट अन्ननलिका स्वच्छ होते.

Khokla Ayurvedic Gharguti Upay

2. काही वेळा खोकताना खोकल्याचा आवाज वेगळा येतो. कफ झाल्याची जाणीव होते. अशा वेळी काळ्या मियांचा औषध म्हणून
चांगलाच उपयोग करता येतो. सहा काळे मिरे घेऊन त्यांची पावडर करावी. त्यात जेवढा मावेल तेवढा गूळ घालून त्याची गोळी करावी. ही गोळी रात्रीच्या जेवणानंतर कमीतकमी एक तास जाऊ देऊन व झोपण्यापूर्वी घ्यावी. त्यावर पाणी पिऊ नये. असे तीन दिवस केल्यास कफ शौचावाटे पडून जाऊन बरे वाटते. मोठ्यांसाठी सहा मियांचा वापर, तर लहान मुलांसाठी तीनच काळे मिरे घ्यावेत. तीन वर्षांपर्यंत लहान मूल असेल तर त्या प्रमाणात मिरे एक किंवा दोनच घ्यावेत.

3. कफ होऊन सारखा खोकला होत असल्यास अर्धा चमचा मोहरीची पावडर + अर्धा चमचा खडीसाखर (बारीक करून) हे मिश्रण घेतल्यास कफ सुटून घसा मोकळा होतो.

4. लहान मुलांना श्वास लागतो, खोकला येतो. अशा वेळी हिंगाचा खडा दोऱ्याला बांधून गळ्यात ताइतासारखा आठ दिवस ठेवल्यास त्याचा विकार बरा होतो.

5. काही वेळेला कफ छातीत बसला आहे असे आपण म्हणतो. हा कफ पातळ होण्यासाठी मोठ्या माणसांनी पाण्याचा वाफारा घेतल्यास कफ पातळ होण्यास मदत होते. बादलीभर गरम पाणी घेऊन दोन्ही पायाजवळ ती ठेवल्यास, आपण स्टुलावर बसल्यावर डोक्यावर व बादलीवर फडके किंवा मोठा टॉवेल ठेवावा व वाफारा घ्यावा. यावर दुसरे साधे औषध घेता येते: अर्धा चमचा मध + अर्धा चमचा मलिंबाचा रस + अर्धा चमचा बँडी घेऊन हे मिश्रण दर दोन-तीन तासांनी घ्यावे. म्हणजे कफ पातळ होतो. परंतु लहान मुले व दमा झाला असल्यास बँडीचा वापर करू नये.

6. कधी कधी मधूनच खोकला येतो. अशा वेळी रात्री झोपताना पाव चमचा जिऱ्याची पूड + पाव चमचा सुंठीची पावडर व एक चमचा मध घालून मिश्रण करून खावे.

7. साधा सर्दी, खोकला, कफ झाल्यास एक चिमटी मिरपूड तोंडात टाकून एक पेला गरम पाणी वर प्यावे. असे तीन दिवस करावे.

8. सर्दी-पडसे झाल्यास मूठभर कडूनिंबाची पाने धुवून घ्यावीत. एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे. त्याचा लेप कानशिलावर द्यावा.

9. खोकला येऊन कफ पडत असेल तर चार वेलदोड्यांची पावडर + तेवढीच सुंठीची पावडर + एक चमचा मध घेऊन हे मिश्रण
दिवसातून दोन वेळा घ्यावे.

10. नुसती कोरडी ढास लागत असेल, तर दोन वेलदोडे घेऊन ते तव्यावर चांगले भाजावेत. त्यांची पावडर करून तेवढेच तूप व तेवढीच साखर घालून ते मिश्रण खावे. असे दिवसातून दोन वेळा घ्यावे.

11. तुरटीचा जेव्हा आपण खाण्यासाठी औषधी उपयोग करतो, तेव्हा ती शुद्ध करावी लागते. लहान तुरटीचा खडा फोडून ती वाटीभर गरम पाण्यात ठेवून ते पाणी (विरघळलेले) उन्हात तापत ठेवावे. म्हणजे तुरटीचा फक्त थर शिल्लक राहिला की ही तुरटी शुद्ध झाली. त्याची पावडर पाव चमचा व मध अर्धा चमचा घेऊन ते मिश्रण चाटल्यास डांग्या खोकला बरा होतो. असे दिवसातून दोनदा करावयास हवे.

12. खूप खोकला येत असेल, तसेच दमा असेल, श्वास लागत असेल, पण कफ तर पडत नाही, अशा वेळी चार लवंगा तव्यावर भाजून नंतर त्यांची पावडर करावी व हे चूर्ण एक चमचा मधातून चाटण करून घ्यावे. पोटात दुखून पांढरे शौचास होत असेल, तर असेच चाटण चाखल्यास बरे वाटते. मात्र लहान मुलाच्या वयाप्रमाणे लवंगांचे प्रमाण कमी करावे.

13. सारखा खोकला येत असल्यास अगर श्वास लागत असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा धने घालावेत व ज्येष्ठमधाचा तुकडा त्यात टाकून ते पाणी आटवून पाव ग्लास करावे.

14. खोकला झाल्यास बडीशेप व खडीसाखर खावी.

Khokla Sathi Gharguti Upay

15. खोकला, कफ, सर्दी यांवर रोज विड्याचे पिकलेले पान दिवसातून दोन वेळा खावे.

16. खोकल्यावर सुंठीची पावडर अर्धा चमचा + पिंपळी चूर्ण पाव चमचा + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात घालून घ्यावे.
दिवसातून हे दोनदा घ्यावे.

17. खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे(नारळाचे) पाव वाटी घेऊन त्यात पाच-सहा मनुका घालून खावे.

18. खोकल्याने घसा बसल्यास एक चमचा विड्याच्या पानांचा रस घेऊन त्यात एक चिमटी मिरपूड घालून हे मिश्रण घ्यावे.

19. एक चिमटी काताची पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे.

20. चिकणी सुपारी खावी.

21. खोकल्याचा सारखा ठसका लागत असल्यास विड्याच्या पानात थोडासा कात घालून हे पान दाढेखाली धरून चावावे.

22. लहान मुलांना खोकला झाल्यास नारळाचा रस काढणे व एक चमचा हा रस व एक चमचा मध घेऊन हे चाटण दिवसातून दोन वेळा देणे.

23. दोन वेलच्या + दोन लवंगा घेऊन त्या करपून त्याची पावडर एक चमचा मधातून हे चाटण देणे.

24. लहान मुलांची पडजीभ वाढल्याने खोकला वाढतो, तेव्हा चिंचोका उगाळून त्याचा लेप गळूवर द्यावा. पडजीभ व्यवस्थित होऊन खोकला थांबतो.

25. खोकला होऊन कफ झाला असेल तर तुळशीच्या पानांचा दोन चमचे रस घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून चार वेळा असे तीन दिवस घ्यावे.

26. लहान मुलांच्या खोकल्या-कफावर दोन चमचे तुळशीचा रस घेऊन तो दुधातून पाजावा. (लहान मुलांचा खोकला घरगुती उपाय – lahan mulancha khokla upay)

27. खोकला झाल्यास तुळशीची पंधरा-वीस पाने ठेचून गरम करून या पोटिसाने छाती शेकावी.

28. कोरडा खोकला झाल्यास खसखशीची खीर करावी. मूठभर खसखस एक चमचा साजूक तुपात भाजून पाणी अगर दुधात शिजवून त्यात साखर व किंचित मीठ घालून घ्यावी.

29. डांग्या खोकल्यावर व कफातून रक्त पडत असल्यास बाजारातून तुरटी आणून ती कुटून गरम करावी. त्यात थोडे पाणी घालून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून गेल्यावर शुद्ध तुरटी बशीत शिल्लक राहते. तिची एक चमचा पावडर + एक चमचा मध असे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्यावे.

30. कांजिण्या, गोवर आल्यानंतर खोकला राहिल्यास बकुळीची फुले ओंजळभर घेऊन त्याचा एक तांब्याभर पाण्यात काढा करावा. थोडा ज्येष्ठमध व खडीसाखर घालून हा अर्धा तांब्याभर होईल एवढा करावा. रोज अर्धी वाटी याप्रमाणे पंधरा दिवस द्यावा.

31. कफ झाल्यास अडुळशाचा रस एक चमचा + एक चमचा मध घालून हे मिश्रण द्यावे.

32. तुळशीचा रस एक चमचा + अर्धा चमचा मिरपूड हे चाटण घ्यावे.

33. खोकला झाल्यास शेंगदाण्याचे तेल कोमट करून पाव कप द्यावे.

34. तिळाचे तेल कोमट करून पाव कप द्यावे.

35. डॉक्टर्स बँडी एक चमचा + मध एक चमचा + लिंबूरस एक चमचा हे मिश्रण दिवसातून चार वेळा घ्यावे.

36. जेष्ठमध + खडीसाखर चघळावी.

37. बकुळीची फुले ओंजळभर + सुवर्ण चाफ्याची फुले ओंजळभर + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा. दिवसातून पाव वाटी घ्यावा.

38. एक चमचा मध+ एक चमचा ज्येष्ठमध चूर्ण दिवसातून तीन वेळा चाटावे.

39. अडुळशाची पाने वाफेवर उकडून त्याचा रस काढावा. त्यात गूळ घालून पाव कप रस घ्यावा.

40. एक कप दुधात चार लसणीच्या कांड्या ठेचून टाकून ते उकळवून दूध प्यावे.

41. कापराच्या दोन लहान वड्या + एक चमचा साखर घालून घ्यावी.

42. पाच लवंगा भाजून त्यांचे चूर्ण एक चमचा मधातून घ्यावे.

43. टाकणखार अग्नीवर ठेवून तो फुलवावा. ही लाही तयार झाल्यावर एक चमचा मधातून अर्धा चमचा टाकणखार लाही पावडर हे मिश्रण घ्यावे.

44. कोरफडीची पाने भाजावीत. त्यांचा रस काढावा. एक चमचा कोरफडीचा रस घेऊन त्यात चिमूटभर हळद घालावी. असे मिश्रण
दिवसातून तीन वेळा घ्यावे.

45. अडुळसा रस एक चमचा + मध एक चमचा घेतल्यास कफ जातो. अडुळसा उपलब्ध नसल्यास नुसता मध दिवसातून चार वेळा घ्यावा. (एक चमचा याप्रमाणे).

अजून वाचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button